काल्याच्या किर्तनाने जेऊर हैबती येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची हभप महंत वेदांतचार्य देविदासजी महाराज म्हस्के (नेवासा) यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने सांगता झाली. यावेळी जेऊर हैबती व परिसरातील महाराज मंडळी, पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सप्ताह काळात अन्नदान करणारे अन्नदाते पुढीलप्रमाणे- सकाळचा नाश्ता- हभप भाऊसाहेब म्हस्के, हभप दिगंबर शिंदे, हभप रामदास भिकाजी म्हस्के, आप्पासाहेब कदम, हरिभाऊ शिंदे, पांडुरंग तांबे, रामदास म्हस्के, वै. हभप जगन्नाथ बाबा रिंधे यांचे स्मरणार्थ सोपानराव जगन्नाथ रिंधे, वै. हभप लक्ष्मण मामा ताके यांच्या स्मरणार्थ कैलास लक्ष्मण ताके, गिताराम शंकर ताके, देविदास उगले, मोहनराव उगले, कै. मारुतराव लक्ष्मणराव म्हस्के (सावकार) यांच्या पुण्यतिथीनिमित्त आण्णासाहेब मारुतराव म्हस्के (आबा), आचपळराव जवादे, दामोधर गवारे, नारायण गवारे

संध्याकाळचे अन्नदाते-
रघुनाथ उगले, गुलाबराव भाऊ उगले, मोहनराव देशमुख, प्रकाशभाऊ उगले, बाळासाहेब रिंधे (मा.सरपंच), शिवाजी निवृत्ती म्हस्के, प्रल्हादराव रिंधे (भाऊ), गायनाचार्य- हभप कैलास महाराज कोहोक (अहिल्यानगर), हभप शंकर महाराज गवळी (करंजी), मृदंगाचार्य- हभप योगेशजी महाराज शेजुळ (पिचडगाव, साऊंड सिस्टीम- संतकृपा साऊंड सिस्टीम व मंडप डेकोरेशन जेऊर हैबती ता.नेवासा (श्री नानासाहेब चौधरी दाजी)

जाहिरात सौजन्य – धनलक्ष्मी फर्निचर/इलेक्ट्रॉनिक्स /स्टील भांडी माॅल कुकाणा (गणेशराव देविदास उगले), मृदुंगाचार्य- हभप रामदास महाराज सोनवणे, व्यासपीठ चालक- हभप राऊसाहेब महाराज खराडे (बाबा), हभप देविदासजी महाराज म्हस्के, हभप कैलासजी महाराज रिंधे, हभप महेशजी महाराज रिंधे, चोपदार- संपतराव गवारे, दैनंदिन रोज पहाटे पुजा- हभप बापू मामा वाघमारे, दैनंदिन रोजची साफसफाई- अंबादास कपिले, दैनंदिन रोज रांगोळी- कोकिळाबाई कपिले यांनी सेवा दिली. या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.