सुखदेव फुलारी यांची अंनिसच्या सोशल मीडिया विभाग जिल्हा कार्यवाहपदी निवड

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील पत्रकार सुखदेव फुलारी यांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्हा प्रसिध्दी व सोशल मीडिया विभाग कार्यवाहपदी निवड झाली आहे.

रविवारी ४ मे रोजी सकाळी १० वाजता नगर येथील शार्दुल नर्सरी,नालेगाव येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाखांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा जिल्हा प्रेरणा मेळावा संपन्न झाला. त्यात समितीचे राज्य कार्यवाह कॉ.बाबा आरगडे, राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य सरचिटणीस अँड. रंजना गवांदे या राज्य निरीक्षकांच्या उपस्थितीत पुढील दोन वर्षांकरिता अहिल्यानगर  जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली.

नवीन जिल्हा कार्यकारिणी अशी….

बाबासाहेब बुधवंत (जिल्हा अध्यक्ष), डॉ. प्रकाश गरुड व प्रमोद भारुळे (जिल्हा उपाध्यक्ष), विष्णू गायकवाड (जिल्हा कार्याध्यक्ष), विनायक सापा व देवदत्त साळवे (जिल्हा प्रधान सचिव), अँड. अभय राजे (कायदेशीर सल्लागार), सुखदेव फुलारी (प्रसिद्धी व सोशल मीडिया विभाग जिल्हा कार्यवाह),  शशिकांत गायकवाड (बुवाबाजी संघर्ष विभाग जिल्हा कार्यवाह), कारभारी गायकवाड (जात पंचायत मुठमाती अभियान विभाग जिल्हा कार्यवाह), दीपक शिरसाठ (संविधान जागर विभाग जिल्हा कार्यवाह), बी.के.चव्हाण (विविध उपक्रम विभाग जिल्हा कार्यवाह), प्राचार्य अशोक गवांदे (निधी संकलन विभाग जिल्हा कार्यवाह), छाया बंगाळ (महिला सहभाग विभाग जिल्हा कार्यवाह).
यावेळी अशोक सब्बन, कॉ.आप्पासाहेब वाबळे, कॉ. भारत आरगडे, अनिता सापा, प्रा. किसन शेवाळे, अरविंद गाडेकर, काशिनाथ गुंजाळ, हरिभाऊ उगले, विनायक ताकपेरे, शशिकांत जाधव, भावना भारुळे, शब्बीरभाई पठाण, रामचंद्र जाधव, संजय शिरोळे, अँड. अभय राजे, शुभम पात्रकंठी, दीपक शिरसाठ, अँड. राहुल बुधवंत आदी जिल्ह्यातील अकरा शाखांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.