बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत माऊली मल्टीस्टेट को.ऑ. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या बालाजी देडगाव शाखेचे उद्घाटन तारकेश्वर गडाचे महंत हभप गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री, हभप महंत रामगिरीजी महाराज येळीकर, हभप सुखदेव महाराज मुंगसे तसेच हभप सदाशिव महाराज पुंड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रथमतः विधिवत पूजा करत, संत महंत व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फित कापून माऊली मल्टीस्टेटचा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शिरसाठ यांनी केले. शिरसाठ म्हणाले, संत माऊली मल्टीस्टेट ३६५ दिवस सेवा देणारी संस्था असून या संस्थेस महाराष्ट्र बिजनेस अवार्ड, रायझिंग स्टार पुरस्कार ,ग्रामीण पत्रकार संघ पुरस्कार, छत्रपती संभाजी नगर गौरव पुरस्कार, नवराष्ट्र आदर्श आर्थिक पतसंस्था पुरस्कार अशा अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झालेली संस्था आहे.
तसेच आजपर्यंत सामाजिक ,धार्मिक, आध्यात्मिक कार्यात उल्लेखनीय कार्य आहे. ग्रामीण भागातील गरजवंत विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक मदत हा उपक्रम अनेक वर्षापासून कार्यरत आहे. तसेच संत माऊली अपघात विमा संरक्षणही खातेदाराला देण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना पेन्शन योजना व नव नवीन टेक्नॉलॉजी वापरून खातेदारांना विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
संस्थेचा विस्तार तिसगाव, पाथर्डी, कोरडगाव ,ढोरजळगाव ,तेलकुडगाव, भातकुडगाव व आता देडगावमध्ये सातवी शाखा उघडत आहोत. मला सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. यावेळी महंत आदिनाथ महाराज शास्त्री म्हणाले, सुनीलभाऊंच्या अनेक शाखा आहेत. त्यांनी तरुण वयात नोकरी करण्याऐवजी तरुणांना नोकरी उपलब्ध करून दिल्या. त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. सुनीलभाऊंचा अभिमान वाटतो.
संस्थेचा विस्तार असाच महाराष्ट्रभर व्हावां, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. यानंतर महंत रामगिरीजी महाराज आपल्या मार्गदर्शनपर म्हणाले की, सुनीलभाऊंचे कार्य संत माऊलीसारखे असून त्यांच्या रूपात माऊली दिसतात. त्यांचे नाव माऊली असायला पाहिजे होते.
साधुसंताच्या आशीर्वादाने त्यांची प्रगती झाली आहे. त्यांच्या हातून जनतेची, ईश्वराची, सर्वसामान्यांची सेवा घडावी व त्यांना उदंड आयुष्य लाभो व संस्था प्रगतीपथावर जावो, अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे, माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे, धस साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करत नवीन संस्थेस शुभेच्छा दिल्या. यानंतर संस्थेच्या वतीने उपस्थितांचा सन्मान करण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्यास वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेशराव पालवे, नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी चेडे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच महादेव पुंड, युवा नेते महेश काळे, तेलकुडगाव सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव घोडेचोर, व्हा. चेअरमन हरिश्चंद्र काळे, कासार भाऊजी, महेश घोडेचोर, भाऊ घाडगे ,पांडुरंग बडे, रामदास ढाकणे, बबन बडे ,सुनील भवार, गौतम गुगळे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे , माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, चंद्रभान कदम, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, सोपान तांबे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुनील मुथ्था,
रामभाऊ कुटे, देडगाव सोसायटीचे व्हा. चेअरमन रामनाथ गोयकर, संभाजी काजळे आकाश चेडे, बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, बाळासाहेब चोपडा, जालिंदर खांडे, योसेफ हिवाळे, संजय शिंदे ,प्रेमचंद हिवाळे, अरुणराव बनसोडे ,बाळासाहेब बनसोडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोसले आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत, पावन गणपती देवस्थानचे विश्वस्त भाऊसाहेब मुंगसे, बन्सी आप्पा मुंगसे तसेच देडगाव, तेलकुडगाव , ढोरजळगाव, माका, घाटशिरस, पाथर्डी आदी गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर संस्थेचे कर्मचारी अनिल घोडेचोर, कृष्णा घाडगे, अक्षय काळे, तुकाराम शिंदे ,अजित बनसोडे ,अमित मुंगसे, ज्ञानेश्वर कुऱ्हे, अविनाश कुटे, श्रीधर आहेर व सायली घोडके मॅडम यांनी विशेष परिश्रम घेत सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनूस पठाण, महेश मिसाळ यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी मानले.
