श्री क्षेत्र पावन महागणपती येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरा परिसरातील श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थान येथे सालाबादप्रमाणे गणेशचतुर्थी निमित्त उत्सवास सुरुवात झाली आहे. गुरुवर्य भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज व गाथामूर्ती हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या आशीर्वादाने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. दररोज अन्नदान, भजने, हरी जागर, आरती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या उत्सवादरम्यान ज्ञानदेव रक्ताटे, नवनाथ महाराज तांबे, अ‍ॅड. कुणाल शिंदे, विजयराव चेडे, हभप पांडुरंग महाराज रक्ताटे, दिनेशशेठ गुगळे, विश्वास हिवाळे, सोपान मुंगसे ,अशोक चोपडे, मुक्ता चंद ,पोपाट वाघमोडे, सोपान पांढरे, मळू वाघमोडे, गोरक्षनाथ मुंगसे, ज्ञानदेव तिडके, सारंगधर तिडके, लक्ष्मण मुंगसे सर, दादा वाघमोडे, भिवाजी वाघमोडे, बन्सी मुंगसे, विठ्ठल कदम, संपत मुंगसे, मारुती दारकुंडे, वाघमोडे मेजर, लहानु कादे चेअरमन, गणेश बनसोडे, हरीभाऊ देवकाते, पंढरीनाथ बनसोडे, शिवाजी बनसोडे चेअरमन, मेजर नवनाथ कुटे, मेजर लोखंडे अहमदनगर, विलासराव मुंगसे, शिवाजीराव कादे, लाल बहादूर कोकरे साहेब या अन्नदात्यांनी दररोजच्या पंक्तीचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात मंगळवारी (ता.१७) तारकेश्वर गडाचे मठाधिपती महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे ९ ते ११ काल्याचे किर्तन होईल. यानंतर सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, कांदा व्यापारी गणेश मोटे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष संभाजी मुंगसे, तज्ञ विश्वस्त अशोकराव मुंगसे, बन्सी आप्पा मुंगसे, आदिनाथ कुटे, भाऊसाहेब मुंगसे, नवनाथ रक्ताटे, देवराव टांगळ, देविदास रक्ताटे आदी परिश्रम घेत आहेत.