बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. चोपडे म्हणाले, विद्यार्थ्यांमधून उद्योजक व संशोधक निर्माण करण्याच्या दृष्टीने अविष्कार संशोधन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. अशा स्पर्धेमधून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होते. नोकरीच्या मागे न धावता स्वतः उद्योजक बनून रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात. अविष्कार स्पर्धेचे समन्वयक प्रा. आदिनाथ काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ.अमोल दाहातोंडे, प्रा.शुभम पाटील, प्रा.अमोल दरंदले यांचे सहकार्य लाभले. सदर स्पर्धेत अदिती गायकवाड, सोनाली चांडे, स्वाती काळे, दिपाली तमनर, शितल खताळ, वैष्णवी थोरात, प्रियंका भानगुडे, वैष्णवी बोरूडे, कविता मदने, वैष्णवी लोंढे आदींनी पोस्टर्स प्रेझेंटेशन करून सहभाग नोंदवला. स्पर्धाप्रसंगी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.
