बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील
तेलकुडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसानचा नारा बुलंद करणारे भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. नागरिकांनी “जय हिंद जय स्वच्छता” स्वच्छतेची शपथ घेऊन गावांमध्ये सामूहिक जबाबदारीने प्रत्येकाने स्वच्छतेची दखल घेतली पाहिजे व दुसऱ्यांना ही सांगितली पाहिजे, हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून सामूहिक शपथ घेण्यात आली.
यावेळी तेलकुडगावचे सरपंच सतिशराव काळे, उपसरपंच शरद काळे, मा. सरपंच बालकनाथ काळे, मा.सरपंच सुरेश काळे, मा.उपसरपंच अशोकराव काळे, मा.उपसरपंच एकनाथ घोडेचोर, नारायण काळे, मा. सरपंच रेवन्नाथ काळे, अर्जुन गायकवाड मेजर, साईनाथराव काळे, मा.चेअरमन ज्ञानेश्वर काळे, हभप नवनाथ महाराज, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव काळे, छानदेव घोडेचोर, प्रसाद घोडेचोर, सुदाम काळे, अंबादास शेंडगे, राजेन्द्र पेत्रस, कानिफनाथ घोडेचोर, संजय घाडगे, लक्ष्मण काळे, हरिश्चंद्र काळे, मच्छिंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
