बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील शंकर बाबुराव लाड यांचा दशक्रिया विधी रविवारी दिनांक १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता बालाजी देडगाव येथे होणार आहे. दशक्रिया विधिनिमित्त बालाजी देडगाव येथील महादेव मंदिरात हभप घन:श्याम महाराज शिंदे (शिरापूरकर) यांचे ८ ते १० या वेळेत प्रवचन होणार आहे. या दशक्रिया विधीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन छबुबाई शंकर लाड (पत्नी), संजयकुमार शंकर लाड (मुलगा), सुनीता अशोक हराळे (मुलगी), राजेंद्र शंकर लाड (मुलगा) यांनी केले आहे.
