महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करणार- आमदार गडाख

राजकीय

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील माका येथे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारफेरी दरम्यान ते बोलत होते. यावेळी माका गावचे माजी सरपंच गोरक्षनाथ घुले, माजी पोलीस पाटील किसन भानगुडे यांनी आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितित सेनेत प्रवेश केला. यापुढे आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे घुले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास गोल्हार, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के, उपसरपंच अनिल घुले, नेवासा लॉर्यस कन्झ्यूमर सोसायटीचे चेअरमन अँड. गोकुळ भताने, खंडूभाउ लोंढे मुळा बँकेचे चेअरमन माणिक होंडे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी लक्ष्मण पांढरे, रामदास घुले, जगन्नाथ घुले, देवीदास भुजबळ, एकनाथ जगताप, साहेबराव होंडे, बाळासाहेब गायके, एकनाथ भुजबळ, किसन पाटील भानगुडे, डॉ. केकाण, दिलिप शिंदे (गुरव), सतिष पटेकर, जाकीर पठाण, सुभाष गाडे, नामदेव लाडके, आदिनाथ म्हस्के, राजेंद्र पालवे, शहादेव लोंढे, बाबासाहेब कोकाटे, प्रल्हाद शेंडगे, गोवर्धन रुपनर, अण्णासाहेब केदार, बबन भानगुडे, सतिष लोंढे, बालादित्य घुले, मल्हारी आखाडे, योगेश शिंदे, बळीराम काळे, अंबादास लोंढे, शनैश्वर लोंढे, संजय सोन्नर, भाउसाहेब वांढेकर, प्रशांत भुजबळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच अनिल घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.