आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी श्री बालाजी मंदिरात अभिषेक

संपादकीय

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेवासा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळावी, या करीता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी देडगाव येथील श्री बालाजी देवस्थान येथे अब्दुल भैय्या शेख व डॉ. बाळासाहेब कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिषेक करुन साकडे घालण्यात आले. विजयी झालेले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळावी, या करीता अब्दुल भैय्या शेख व कार्यकर्ते महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत. अब्दुल भैय्या शेख व कार्यकर्ते महायुतीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार असून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळात संधी द्यावी, यासाठी निवेदनाद्वारे मागणी करणार आहेत. अब्दुल भैय्या शेख बोलताना म्हणाले की, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव बघता, त्यांचा अनुभवाचा फायदा राज्याला व मतदारसंघाला होणार आहे. लंघे पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेले काम बघता मंत्रिपदाच्या माध्यमातून ते नेवासा तालुक्याचा विकास घडवून आणतील. तसेच राज्यातील जनतेलाही लंघे पाटील यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे. आमदार लंघे पाटील यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असल्याने त्यांचे मंत्रिपद सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अब्दुल भैय्या शेख यांनी केली आहे. या प्रसंगी मच्छिंद्र मुंगसे, निलेशभाऊ कोकरे, मकरंद राजहंस, कैलास महाराज रिंधे, अभिराज आरगडे, जालुभाऊ खांडे, बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, विश्वस्त रामभाऊ कुटे, एकनाथ फुलारी, बंडा मुंगसे, बाळासाहेब घाडगे ,विठ्ठल काळे, सोपान मुंगसे, सोनाली मुंगसे, बलदेव तांदळे, राजेंद्र तांदळे, सचिन इंगळे, अक्षय इंगळे, मच्छिंद्र गव्हाणे, ज्ञानदेव जगताप, अशपाक इनामदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक मच्छिंद्र मुंगसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.