बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सव संपन्न

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पावधीत लौकिक मिळवलेल्या कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूल माका मध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून हभप प्रदीप महाराज वाघमोडे, सहदेव लोंढे, भानुदास वाघ, शरद तिळवने, दत्तात्रय बाचकर, राजेंद्र आघाव, वासुदेव घुले, अश्विनी पांढरे, रुपाली कांबळे, श्री. सानप , विनोद कोकाटे, शहाराम होंडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्कूल राबवत असलेल्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे यांनी स्कूल राबवत असलेल्या विविध विद्यार्थी हिताच्या उपक्रमाची माहिती दिली व सर्व चिमुकल्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, हभप प्रदीप महाराज वाघमोडे, प्रा. भानुदास वाघ, सहदेव लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेच्या संचालिका मिना बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.