बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील गुणवत्ता, संस्कार व संस्कृती, शिस्त जपणारी शाळा म्हणून लौकिक असलेली व गुणवत्ता पूर्ण व दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेली चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला नुकताच बेस्ट स्कूल अवॉर्ड मिळाला आहे.
रंगोत्सव संस्था मुलुंड मुंबई येथील संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे. मुलुंड येथील रंगोत्सव सेलिब्रेशन आयोजित हस्ताक्षर व रांगभरण स्पर्धेत एकच शाळेचे अनेक विद्यार्थी सलग सात वर्षांपासून सुवर्ण पदकांचे मानकरी ठरले आहेत. स्कूलने विद्यार्थी हिताचे राबवले अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम प्रभावी आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत टिकला पाहिजे, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन ही शाळा काम करीत आहे. स्पर्धात्मक युगात आपला विद्यार्थी टिकला पाहिजे, या दृष्टीने या शाळेचे प्राचार्य व व्यवस्थापन काम करीत आहे. एकाच स्कूलचे एकाच वेळी अनेक विद्यार्थी सुवर्णपदकांची मानकरी ठरणारी ही तालुक्यातील एकमेव शाळा आहे. याच कार्याची दखल घेऊन संस्थेने हा पुरस्कार दिला असल्याची माहिती संस्थेचे पुरस्कार निवड समितीचे प्रमुख संग्राम दाते यांनी दिली.
शाळेची सर्व टीम प्रामाणिकपणे ,तळमळीने,निष्ठापूर्वक व काळजीपूर्वक विद्यार्थी हित जोपासत आहेत.हा पुरस्कार त्याचीच पावती आहे. असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे यांनी सांगितले. या पुरस्काराबद्दल शाळेचे परिसरातून कौतुक होत आहे.
