नितीशकुमार रेड्डी ऑस्ट्रेलियाला नडला; ठोकले दणदणीत शतक

देश विदेश

जनशक्ती (वृत्तसेवा)- मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. विशेषत: नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हा दिवस गाजवला. तिसऱ्या दिवशी या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेट्ससाठी अक्षरशः रडवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 358/9 धावा केल्या होत्या. नितीश रेड्डी आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून नाबाद परतला आहे. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज क्रीझवर आहे. टीम इंडिया आता कांगारूंपेक्षा 116 धावांनी मागे आहे.
ऋषभ पंत 28 धावा करून बाद झाला आणि रवींद्र जडेजा 17 धावा करून बाद झाला, तेव्हा भारताला फॉलोऑनचा धोका होता. भारताने 221 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर सामना भारताच्या हातातून पूर्णपणे निसटल्यासारखे वाटले, पण नितीशकुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हार मानली नाही. या दोघांनीही आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.