अब्दुलभैया शेख यांच्या संकल्पनेतून कुकाणा येथे जनता दरबार

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने तसेच अब्दुलभैया शेख यांच्या संकल्पनेने व माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने करण्यात आली. जनता दरबारामध्ये आलेल्या महिला व पुरुषांच्या विविध प्रश्नांची अब्दुलभैया शेख यांनी सोडवणूक केली. त्यामध्ये रेशन कार्ड, लाडक्या बहिणीचे प्रश्न, डोलाविषयी माहिती, आरोग्य विषयी माहिती तसेच अपंग व्यक्तीसाठी विविध योजना, नवीन मतदार नोंदणीसाठी आधार अपडेट, महिला सबलीकरणासाठी पिंक रिक्षा योजना, बांधकाम मधुर कामगार योजनेसाठी तसेच बचत गटासाठी अशा विविध शासकीय योजनेची माहिती तसेच त्याची सोडवणूक अब्दुलभैया शेख यांनी या जनता दरबाराच्या माध्यमातून केली.
जनता दरबार प्रसंगी मंचावर युवा नेते अब्दुलभैया शेख बोलताना म्हणाले की, मला सर्व पक्षाची नेतेमंडळी सपोर्ट करतात व चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात. या ठिकाणी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचे नेते व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे सर्वांचे स्वागत करतो. अनेक प्रश्नांची सोडवणूक करत सर्वांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत.
यावेळी पुरुषोत्तम चिंधे यांनी प्रास्ताविक केले व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अशोक मोरे, उत्तर महाराष्ट्र कामगार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मकरंद राजहंस यांनी आपले मनोगत व्यक्त करत जनता दरबारात शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब अब्दुलभैय्या यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी स्वतः उपस्थित राहत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास माजी सरपंच एकनाथ कावरे, विद्यमान उपसरपंच सोमनाथ कचरे, सतीश गोडसे, अभिराज आरगडे, हभप कैलास महाराज रिंधे, सद्दाम पटेल आदी मान्यवर व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. जमाल भाई शेख व इम्तियाज शेख यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.