बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील आमदार व्हावेत म्हणून चांदीचा घोडा चैतन्य नागनाथ महाराजांना वाहण्याचा नवस तेलकुडगाव येथील सोपानराव शेंडगे व अनिता शेंडगे यांनी केला होता. या नवसाची पूर्ती आमदार लंघे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
तेलकुडगाव ग्रामपंचायतच्या ४२ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व आमदार लंघे पाटील यांचा नागरी सत्कार समारंभ प्रसंगी हा सोहळा पार पडला. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, प्रभाकर शिंदे काका, पंचगंगा उद्योग समूह शुगर लि. संस्थापक, बाबासाहेब पाटील चिडे सरला बेट विश्वस्त व लक्ष्मी माता उद्योग समूह संस्थापक, करनजी नवले राष्ट्रसह्याद्री संपादक अहिल्यानगर, गटविकास अधिकारी लखवाल साहेब, कर्डिले साहेब डेप्युटी इंजिनिअर, डॉक्टर कानडे सर, अंकुशराव काळे किसान मोर्चा, सरपंच सतीशराव कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते.
सोपान शेंडगे हा अनेक वर्षापासून भाऊंचा जिवाभावाचा मावळा आहे. गेली वीस वर्षाच्या तपानंतर यावेळी आपले भाऊच म्हणजेच विठ्ठलरावजी लंघे पाटील हेच आमदार व्हावे, ही मनोकामना बाळगून सोपान शेंडगे व त्यांच्या सौभाग्यवती यांनी चैतन्य नागनाथ महाराजांना भाऊ आमदार झाल्यानंतर चांदीचा घोडा वाहण्याचा नवस कबूल केला होता. त्यामुळे ग्रामपंचायत विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी लंघे पाटील यांच्या शुभहस्ते चांदीचा घोडा चैतन्य नागनाथ देवस्थान सचिव अर्जुन गायकवाड यांच्यकडे सुपुर्द करण्यात आला.
