तेलकुडगाव येथे हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना वृक्षांच्या रोपांचे वाटप

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ग्रामपंचायतर्फे आयोजित महिला भगिनींसाठी महिला मेळावा, हळदी कुंकू, तिळगुळ कार्यक्रमात विशेष उपक्रम राबवत महिलांना आंब्याच्या वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. हिंदू परंपरेनुसार महिलांसाठी मकरसंक्रांत हा सण खूप महत्वाचा मानला जातो. त्यामुळे ग्रामपंचायत तेलकुडगावने महिलांसाठी हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम घेण्याचे ठरवले. तसेच यावेळेस विशेष उपक्रम म्हणून पर्यावरण व स्वच्छ हवामान हेतू ठेवून सर्व महिलांना वाण म्हणून आंब्याच्या वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. जास्तीत जास्त महिलांनी मोठ्या संख्येने यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम नागरिक सरपंच लताताई सतिशराव काळे या होत्या. प्रमुख उपस्थितीत सुरेखा शरद काळे उपसरपंच, रंजना बालकनाथ काळे मा.सरपंच, अर्चना सुरेश काळे, ग्रामसेवक काळे भाऊसाहेब,  प्राथमिक आरोग्य केंद्र सुपरवायझर तांबे मॅडम, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या प्रशासिका राऊत मॅडम, सुकासे मॅडम, जिल्हा परिषद शाळेच्या श्रीमती शेंडगे मॅडम, अंगणवाडी सेविका परभणे हिराबाई, गुंफेकर मंदाताई, घोडेचोर मिराबाई, घोडेचोर पद्मा, भगत संगिता, विजया काळे, अनुराधा काळे, संगिता सरोदे, आशा सेविका-इंगोले शोभा, घाडगे शुभांगी, घोडेचोर सविता, साळवे संगिता, गावातील महिलाभगिनीं मध्ये मनिषा काळे, नरवडे कल्पना, कुलकर्णी सुनिता, वंदना थोरात, दरंदले शारदा, कोमल भेंडेकर, सरोदे ताराबाई, काळे, गुगळे, राजहंस माया, गटकळ सुनिता, सुवर्णा घोडेचोर, चक्रनारायन जया, पोपळघट, सविता काळे, अनिता शेंडगे, अश्विनी उनवणे, सरस्वती काळे, उज्वला काळे, लिपने, उनवणे, गुगळे, राजहंस, शालिनी सरोदे, सोनाली शिंगटे, लता अ. काळे, मुक्ता काळे, रंजना घोडेचोर, संगिता काळे, जाधव सपना, प्रियंका शिरसाठ, प्रतिभा गटकळ, पातळे जिजाबाई, सुवर्णा माळी, सविता झेंडे, रोहीणी सरोदे, मनिषा सरोदे, शिला काळे, वर्षा, शारदा घोडेचोर, मिना पाटेकर, सरोदे मयुरी, रेखा तेलधुणे, दळे सुवर्णा, योगिता शेंडगे, अनिता दुधाडे, छाया सरोदे, काळे, घोडेचोर,घाडगे, शेटे, म्हस्के,माने, भगत, कुलकर्णी, गुंफेकर, शेंडगे, पातळे, साळवे, सरोदे, तेलधुणे, मिसाळ, निपुंगे, लवांडे, पवार, माळी, उनवणे, शिरसाठ चक्रनारायन, दळे, बळीद तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ महिलांनी, अनमोल अशी कामगिरी बजावली. त्यामध्ये उमेदचे महिला समुह गट पुढीलप्रमाणे शिव महिला, पूजा महिला, सिद्धी महिला, साई महिला, ओम महिला, रचना महिला, त्रिमूर्ती महिला, समता महिला, कानिफनाथ महिला, एकविरा महिला, जयभीम महिला, राहुल महिला, नागनाथ महिला, लक्ष्मी महिला, श्रीकृष्ण महिला, वेद माहिला, भारती महिला, स्वामी समर्थ महिला, माउली महिला, पवन हनुमान महिला, साईराम महिला, झाशी महिला आदी महिला गट, तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत असलेले बचत गट पुढीलप्रमाणे भाग्यश्री महिला, हिरकणी महिला, साईकृपा महिला, शिवपार्वती महिला, मातोश्री महिला, आठवण महिला, मोनिका महिला, स्वंयसिद्ध महिला, झाशीची राणी महिला गट व गावातील सर्व समाज घटकातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यापुढे देखील महिला भगिनींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ठरले. ग्रामपंचायत वतीने महिला भगिनींसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या सर्व महिला भगिनीं पोहचविण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध राहील. तसेच ग्रामपंचायत ही सर्वसामान्यांसाठी जनहिताचे काम करणारी तळागाळापर्यंत शासनाच्या सर्व प्रकारच्या योजना पोहचविण्यासाठी हक्काची संस्था आहे. ग्रामपंचायतने हळदी कुंकू, महिला ग्रामसभा, तिळगुळ वाटप कार्यक्रमानिमित्त आंब्याच्या वृक्ष रोपांचे वाटप केले, या विशेष उपक्रमाबद्दल कौतुक होत आहे.