चाईल्ड करिअर ज्युनिअर कॉलेजची अलसबा शेख सुवर्णपदकाची मानकरी

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- सायन्स ओलंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या नॅशनल सायन्स ओलंपियाड स्पर्धा परीक्षेत नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील गुणवत्ता,संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून लौकिक असलेली व आई.एस.ओ मानांकन प्राप्त असलेली चाईल्ड करिअर जुनियर कॉलेजची विद्यार्थिनी अलसबा शेख हिने नॅशनल लेव्हलच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून सुवर्णपदक प्राप्त केले असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य रवींद्र गावडे यांनी दिली. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे, विश्वस्त अंबादास गोरे, मनोहर बनसोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सदस्य विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले. सदर विद्यार्थिनीस प्रा. संजय गरोटे, प्रा. निलेश निधाने, शाहरुख सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.