बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची बालाजी देडगाव येथे पेढेतुला होणार आहे. येथील युवा नेते निलेश कोकरे व बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांच्या वतीने महादेव मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्वप्रथम आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची बसस्थानक ते महादेव मंदिर अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर महादेव मंदिर येथे भव्य नागरी सत्कार व पेढेतुला करण्यात येणार आहे. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा विविध संघटनांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. तरी यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन युवा नेते निलेश कोकरे व बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
