पंचगंगा उद्योग समूहाचे चेअरमन प्रभाकरजी शिंदे यांची देडगाव येथील यात्रोत्सवास सदिच्छा भेट 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेच्या मुख्य दिवशी २६ फेब्रुवारी रोजी पंचगंगा उद्योग समूहाचे चेअरमन प्रभाकरजी शिंदे यांनी यात्रोत्सवास भेट दिली. महाशिवराञोत्सवानिमित्त महादेव मंदिर व बालाजी मंदिर येथे पंचगंगा उद्योग समूहाचे चेअरमन प्रभाकरजी शिंदे यांनी दर्शन घेतले. बालाजी मंदिर येथे बालाजी देवस्थानच्यावतीने पंचगंगा उद्योग समूहाचे चेअरमन प्रभाकरजी शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर महादेव मंदिर येथे कैलासनाथ मित्रमंडळाच्यावतीने प्रभाकरजी शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, भाजप नेते सतिश कर्डिले, प्रताप चिंधे, मते साहेब, संभाजी काजळे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, युवा नेते निलेश कोकरे, आकाश चेडे, देवस्थानचे विश्वस्त सुनिल मुथ्था, कैलासनाथ मित्रमंडळाचे राजेंद्र कदम, अरुण वांढेकर, हरिभाऊ देशमुख, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रभाकरजी शिंदे म्हणाले, बालाजी मंदिर व महादेव मंदिर येथील दर्शनानंतर मन प्रसन्न झाले असून येथील गावकऱ्यांनी केलेल्या सन्मानाने आनंद वाटला आहे.