बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र तेलकुडगाव येथील ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सव सर्व ग्रामस्थ व यात्रा कमिटी गावकरी मडळीच्या सहकार्यातून उत्साहात संपन्न झाला.
महाशिवरात्रीनिमित्त हभप नंदकिशोर महाराज खरात यांची किर्तनसेवा झाली व तद्नंतर यजमान मंडळी यांच्या वतीने महाफराळ पंगत झाली. गुरुवारी सकाळी चैतन्य नागनाथ महाराजांच्या मुर्तीस भाविकांनी गंगेवरून पायी पाणी आणत ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराजांना गंगाजल स्नान घातले. चांगली सजावट असणाऱ्या PSI प्रतिक-सहकारी, बाळकृष्ण, ऋषिकेश, सुरज या कावडीधारकांना यात्रा कमिटीने बक्षिस दिले. रात्री देवाची छबीना मिरवणुक, भव्यदिव्य शोभेच्या दारूची आतिषबाजी होऊन नंतर राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या मंगलाताई बनसोडे लोकनाट्य तमाशा शांततेत पार पडला. तद्नंतर रात्री देवाचा जागर म्हणून सेवक समस्त पातळे परिवार वतीने जागरण गोंधळ संपन्न झाले.
शनिवारी सकाळी हनुमान मंदिर प्रांगणात यात्रेतील शोभा वाढविण्यासाठी सहभागी झालेल्या कला कसरतकराना हजेरी कार्यक्रमात बिदागी देण्यात आली. आणि सर्वात मुख्य म्हणजे समस्त ग्रामस्थ मंडळी व दानशूर यजमान मंडळी यांच्या सहकार्यातुन नियोजनबद्ध दुपारी ३ ते रात्री संपेपर्यंत डे-नाईट श्री चैतन्य नागनाथ क्रीडा संकुल श्रीरामनगर येथे तीन ते चार लाख रुपयांपर्यंत नामांकित राष्ट्रीय मल्लांच्या ऐनवेळी येणाऱ्या मल्लांच्या नावनोंदणी करुन कुस्त्यांचा जंगी हगामा संपन्न झाला. भव्यदिव्य असे चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सव कमिटी व पंचकमिटीने उल्लेखनीय कामगिरी बजावत कौतुकास्पद असे यात्रोत्सवाचे आयोजन व नियोजन करण्यात आले. प्रामुख्याने सतिशराव काळे सरपंच, शरद काळे उपसरपंच, बालकनाथ काळे मा.सरपंच,सुरेश काळे साहेब मा सरपंच, एकनाथ घोडेचोर मा.उपसरपंच, अशोकराव काळे उपसरपंच, नारायण पा. काळे, सुर्यभान घोडेचोर,बाबुराव काळे तंटामुक्ती अध्यक्ष, हभप अमोल महाराज, ज्ञानेश्वर काळे मा.चेअरमन, रेवन्नाथ पा.काळे मा सरपंच, साईनाथराव काळे, भारत काळे मा.उपसरपंच, मच्छिंद्र काळे,आबासाहेब काळे, बाबासाहेब काळे, आत्माराम घोडेचोर, श्रीकृष्ण घाडगे, प्रा मधुकर घाडगे सर, छानदेव घोडेचोर, मोहनराव काळे, भाऊसाहेब काळे, रमेश काळे, पृथ्वीराज गटकळ, आदिनाथ धोरात, कानिफनाथ घोडेचोर,
सचिन काळे, लक्ष्मण काळे, राहुल काळे, दिपक घाडगे, सोपान गटकळ, संतोष काळे मिठू, प्रसाद घोडेचोर, रुपचंद गटकळ, काकासाहेब काळे मा.चेअरमन, केंद्रीय पोलीस अभिमन्यू काळे, पोलीस पाटील श्री.शिवाजी घोडेचोर, व्हा चेअरमन हरिश्चंद्र काळे, देवस्थानचे सचिव अर्जुन गायकवाड, अध्यक्ष हनुमंत गटकळ, रघुनाथ काळे, नामदेव म्हस्के, तुळशीराम काळे भाऊ, बंडूतात्या घोडेचोर, प्राचार्य सोपान काळे सर, विकास काळे सर, पोपट काळे सर, बापू गटकळ सर, आबासाहेब घाडगे सर,
बाळासाहेब काळे सर, निकाळजे सर, कर्डिले सर, काकडे सर, बाळासाहेब हंडाळ, म्हातारदेव काळे, शहाराम घोडेचोर, शैलेश देवा, Adv.सचिन घोडेचोर, प्रकाशशेठ गुगळे, संजय घाडगे, संतोष काळे, सुनील राजहंस, सुदाम काळे, शेटे मोहनराव, राहुल घाडगे, रविंद्र काळे, बाळासाहेब काळे, बबनतात्या म्हस्के, जनार्दन गटकळ, किशोर काळे सर, किशोर घोडेचोर, देविदास काळे, रमेश घोडेचोर, आजीनाथ काळे, संपत घाडगे, शेंडगे सोपान, दानियल साळवे, संजय घोडेचोर, दत्तात्रय काळे, म्हस्के दादा, राजुकाका घाडगे, अमोल गायकवाड, विष्णू घाडगे, शेंडगे अंबादास, रमेश घोडेचोर, संभाजी घोडेचोर, संपत घाडगे,शंकर गायकवाड, राम भेडेकर, अंबादास सरोदे,आत्माराम काळे, भगत बबन, कमलेश काळे, अर्जुन कर्डिले, किशोर घोडेचोर, पत्रकार गणेश घाडगे, बन्शी भाऊ एडके, सोपान भगत, संजय काळे, राजेंद्र तेलधुने, अशोक सरोदे, भगत आप्पासाहेब, भगत बबन, बाळासाहेब गटकळ, परभणे सचिन,अनिल घाडगे,पातळे जगन्नाथ, बाळासाहेब घाडगे, रामदास शेलार,राजेंद्र साळवे, आकाश तेलधुणे, शिरसाठ दिपक, कृष्णा सरोदे, वीरेंद्र घोडेचोर, सागर सरोदे, ज्ञानेश्वर घोडेचोर, विशाल सरोदे, आदि. मान्यवर उपस्थित होते. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक वेशभुषेतील लेझीम पथक, आणि जंगी कुस्त्यांचा हगामा गावातील ग्रामस्थ मंडळीनी चांगल्या नियोजन बद्दल शाबासकीची थाप दिली.
ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाची शोभा ज्यांच्यामुळे हा यात्रोत्सव भव्यदिव्य स्वरूपात यशस्वी करु शकलो असे आर्थिक सहकार्य करुन परिश्रम घेणारे स्वंयसेवक, सर्व ग्रामस्थ मंडळी, भाविक, तरुण बांधव, कुस्त्यांचे यजमान, यांचे चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सव कमिटीच्या वतीने श्री सतिशराव काळे पाटील सरपंच व शरदराव काळे उपसरपंच यांनी आभार मानले.
