जागतिक महिला दिनानिमित्त तेलकुडगाव येथे नागनाथ ग्रामसंघ आॉफिसचे उद्घाटन व महिला मेळावा उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त नागनाथ ग्रामसंघ आॉफिसचे उद्घाटन, महिला मेळावा तसेच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत तेलकुडगावने जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांच्या सहकार्यातून महिला मेळावा, महिला ग्रामसभा, घरकुल शुभारंभ, विविध उपक्रमांचे आयोजन केले.‌ जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा-2 महाआवास अभियान अंतर्गत मंजूर घरकुलापैकी शिलोवर्तीक रत्नाकर कसब, कुसूमबाई मा.गुगळे, शोभा माणिकचंद गुगळे,गणेश माणिक काळे, शिवनाथ ऊत्तम घाडगे हे घरकुल ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, शुभहस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आले.
देशाच्या सर्वोच्चपदी राष्ट्रपती पदापासून थेट ग्रामपंचायत, अंगणवाडी,आशासेविका, आरोग्य विभाग,महिला बचत गट, या स्तरापर्यंत महिला काम पाहत आहेत. महिलांसाठी जागतिक महिला दिन हा सन्मानाचा महत्वाचा दिवस मानला जातो. ग्रामविकास अधिकारी यांनी व सरपंच यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांना सांगितली. क्रांतीकारी महिलानी केलेल्या कार्याबद्दल यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा व महिला मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम नागरिक लताताई सतिशराव काळे व प्रमुख उपस्थितीत सुरेखा शरद काळे उपसरपंच, अर्चना सुरेश काळे, रंजना बालकनाथ काळे, अंजनाबाई एकनाथ घोडेचोर, लंका अशोक काळे, ग्रामविकास अधिकारी काळे बी.बी.भाऊसाहेब, नाथभक्त कोमल भेंडेकर, हभप जयाताई महाराज घाडगे, बचत गटाच्या सुजाता किर्तीशाही मॅडम, अंगणवाडी सेविका-परभणे हिराबाई, गुंफेकर मंदाताई,घोडेचोर मिराबाई, घोडेचोर पद्मा,भगत संगिता,घाडगे मंगल,रोहीणी काळे,अनिता श.काळे सीआरपी-अनुराधा काळे, विजया काळे,संगिता सरोदे, आशा सेविका-इंगोले शोभा,घाडगे शुभांगी, सविता घाडगे, साळवे संगिता, गावातील महिला भगिनींमध्ये अस्मिता काळे, नरवडे कल्पना, कुलकर्णी वहिनी, ऊज्वला काळे, ताराबाई, वैशाली सांळुके, जिजाबाई पवार, प्रतिभा गटकळ, सुवर्णा माळी, अर्चना शेंडगे, सीता जाधव, द्वारका घाडगे,गटकळ सुनिता, सुवर्णा घोडेचोर, शालिनी सरोदे, लता अ.काळे, मुक्ता काळे, निता काळे, जाधव सपना,प्रियंका शिरसाठ,रोहीणी सरोदे, मनिषा सरोदे, शिला काळे, शारदा घोडेचोर, मिना पाटेकर, सरोदे मयुरी, रेखा तेलधुणे, सुवर्णा दळे, शेंडगे वच्छला, या परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ महिलांनी, अनमोल अशी कामगिरी बजावली. त्यामध्ये उमेदचे महिला समुह गट पुढीलप्रमाणे,, शिव महिला,पूजा महिला,,सिद्धी महिला,साई महिला, ओम महिला, रचना महिला, त्रिमूर्ती महिला, समता महिला,कानिफनाथ महिला, एकविरा महिला, लक्ष्मी महिला,श्रीकृष्ण महिला,वेद माहिला,भारती महिला, स्वामी समर्थ महिला, माउली महिला, पवन हनुमान महिला,,साईराम महिला, झाशी महिला,आदि महिला गट समुह तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत असलेले बचत गट पुढीलप्रमाणे भाग्यश्री महिला, हिरकणी महिला, साईकृपा महिला, शिवपार्वती महिला,मातोश्री महिला,आठवण महिला, स्वंयसिद्ध महिला, झाशीची राणी महिला गट, गावातील सर्व समाज घटकातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ग्रामपंचायत वतीने जनहिताचे काम व महिला भगिनींसाठी शासनाच्या माध्यमातून ज्या-ज्या योजना असतील त्या तळागाळापर्यंत प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामपंचायत, सरपंच उपसरपंच सर्व सदस्य कमिटी व पदाधिकारी सक्षम आहोत, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून सरपंच लताताई यांनी सांगितले.