माका जिल्हा परिषद शाळेचे प्रज्ञाशोध व मंथन परीक्षेत घवघवीत यश 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विश्वजित अनिल घुले लक्ष्यवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत चौदावा तर जिल्हा गुणवत्ता यादीत नववा आला आहे.महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त लक्ष्यवेध फौंडेशन संचलित संस्थेअंतर्गत नुकतीच राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरी सेमी इंग्रजीचा विद्यार्थी विश्वजित अनिल घुले हा राज्याच्या गुणवत्ता यादीत चौदावा आला तर जिल्हा गुणवत्ता यादीत नववा आला त्याचबरोबर मंथन परीक्षेतही जिल्हा गुणवत्ता यादीत चौथा आला. तसेच सोहम प्रवीण पटेकर, अथर्व अशोक खेडकर, शिवम राजेंद्र लोंढे, काव्या कैलास धनवटे हे विद्यार्थी देखील राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. या सर्व दुसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गशिक्षिका मीना रावसाहेब म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. हे सर्व विद्यार्थी सेमी इंग्रजीचे विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे आणि वर्गशिक्षिका  मीना म्हस्के यांचे नेवासा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड साहेब, शिक्षणविस्तार अधिकारी रुक्साना शेख, केंद्रप्रमुख कमल लाटे, मुख्याध्यापिका अरुणा वीर, प्रकाश गायकवाड, सुधीर रणदिवे, शकीला शेख, अपर्णा व्यापारी, अनंता एकलहरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियंका प्रविण अंदुरे, माका गावच्या सरपंच विजया पटेकर, उपसरपंच अनिल घुले ,सर्व पालक,सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.