शिष्यवृत्ती परीक्षेत चाईल्ड करिअर स्कूलचे तारे चमकले

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, मार्फत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये सलाबतपूर येथील आयएसओ मानांकन प्राप्त व उपक्रमशील शाळा म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेली चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

सदर परीक्षेत विद्यार्थी सोहम अजिंक्य विधाटे, यश सोमनाथ गोरे, तनुजा दीपक गणगे, अक्सा समीर पठाण, आदिती दिगंबर मते या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक शाहरूक सय्यद, कैलास तांबे, संजय गरुटे, निलेश निधाने, संतोष निकम यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे, स्कूलचे प्राचार्य रवींद्र गावडे, विश्वस्त अंबादास गोरे यांच्यासह ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले आहे.