शिष्यवृत्ती परीक्षेत माका विद्यालयाचे घवघवीत यश

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यामध्ये नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईचे राजश्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माका या विद्यालयाचे इयत्ता पाचवीचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
यामध्ये वैष्णवी कैलास बजांगे 138, अक्षदा सागर शिरसागर 170, अक्षदा शशिकांत गवांदे 184 गुण मिळवले. हे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. यासाठी विद्यालयाचे प्राचार्य वसंतराव घुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक गायकवाड सर, वर्गशिक्षक व इतर शिक्षकवृंद यांनी मोलाची कामगिरी बजावली. या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. प्रभाकर गवांदे मेजर, कैलास बजांगे सर, वनिता क्षीरसागर यावेळी उपस्थित होते.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाख, संस्थेचे सचिव लोंढे सर, प्रशासन अधिकारी तुवर सर यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.