बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे मुळा पाटबंधारे विभाग अहिल्यानगरच्या वतीने जलसंपदा आपल्या गावी या मोहिमेअंतर्गत जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुळा पाटबंधारे विभाग व बळीराज्य संघटना देडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी व देडगाव येथील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, भाजपचे आकाश चेडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य शरद तांबे, माजी चेअरमन संतोष तांबे, बाजीराव मुंगसे, संजय मुंगसे, विश्वास हिवाळे, कांता हिवाळे, ए एस चव्हाण, एस बी झेंडे, व्ही के सानप, एस व्ही देशमुख, जमदाडे साहेब, जनार्धन मुंगसे, किशोर कदम, पत्रकार इन्नुस पठाण, हरिभाऊ मुंगसे, विठ्ठल काळे, शिवाजी एडके, अकबर पठाण आदी देडगाव व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, पाटबंधारे विभागाचे झेंडे साहेब व इतर अधिकाऱ्यांनी जल व्यवस्थापन व जल व्यवस्थापन कृती पंधरवडा विषयी सविस्तर माहिती दिली. शेवटी बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
