जनशक्ती (वृत्तसेवा)- शैक्षणिक वर्ष 2025 – 2026 पासून महाराष्ट्र शासनाने इयत्ता अकरावीची प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करावयाचे ठरवले आहे. हे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? विद्यालयाचा प्राधान्यक्रम कसा निवडावा? त्यासाठी कोणती कागदपत्रे जोडावी? फॉर्म चे शुल्क किती भरावे? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर व पालकांसमोर आहेत. या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी चाइल्ड करिअर जुनियर कॉलेजमध्ये ऑनलाईन मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांनी चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सलाबतपूर कॉलेजमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य रवींद्र गावडे सर यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी सोबत येताना दहावी शाळा सोडलेला दाखला, दहावीचे मार्कशीट, आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन यावेत, विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत व मार्गदर्शन केले जाईल. तरी या सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीने केले आहे.
