नूतन तलाठी मंगल गुसिंगे यांचे स्वागत तर बालाजी मलदोडे यांना देडगाव ग्रामस्थांकडून निरोप

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कामगार तलाठी बालाजी मलदोडे यांची बदली झाली तर त्या जागेवर मंगल गुसिंगे यांची देडगाव सजेवर नियुक्ती झाली. त्यानिमित्ताने देडगाव ग्रामस्थांच्या वतीने नूतन तलाठी मंगल गुसिंगे यांचे स्वागत तर बालाजी मलदोडे यांना निरोप देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले. त्यांनी नूतन आलेल्यांचे स्वागत तर बदली होऊन गेलेला निरोप देत शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, कांदा व्यापारी हरिभाऊ तागड आदींनी आपले मनोगत व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी निरोप घेताना बालाजी मलदोडे यांनी आपल्या भावना व्यक्त करत या गावाने मला खूप प्रेम दिलेले आहे. अतिशय सोज्वळ गाव असल्याने गेली तीन वर्षे नऊ महिने प्रशासकीय कामात मला खूप शिकायला मिळाले. गावाने साथ दिल्याने गावची सेवा करण्यास संधी मिळाली. माझा हा निरोप समारंभ कायम माझ्या मनात राहील .मी या गावचा कायम ऋणी राहील, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
तर नूतन तलाठी मंगल गुसिंगे पदभार स्वीकारताना म्हणाल्या की, मलाही गावाने अशी साथ द्यावी. नक्कीच कोणाच्याही कामाची अडवणूक होणार नाही. सर्वसामान्य लोकांची कामे वेळेवर करून सर्वांना विविध योजनांविषयी माहिती देत चांगले काम करण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासित केले.
यावेळी विविध शाखेच्या व संघटनेच्या वतीने दोघांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी देडगाव मंडलाधिकारी सुनील खंडागळे, ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गवळी, खरेदी विक्री संघाचे संचालक कडूभाऊ तांबे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, अशोक पाटील मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, माजी सरपंच रामेश्वर गोयकर, माजी उपसरपंच लक्ष्‍मणराव गोयकर, विश्वस्त रामभाऊ मामा कुटे, ग्रामपंचायत सदस्य विश्वास हिवाळे, किशोर वांढेकर, भिमराज मुंगसे, अरुण वांढेकर, फकीरचंद हिवाळे, भारत कोकरे, शहादेव मुंगसे, पोपटराव बनसोडे, भीमराज मुंगसे, अंबादास मुंगसे, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश तांबे, बाळासाहेब म्हस्के ,संजय कुटे, किरण मुंगसे, नितीन हिवाळे, बालाजी दूध डेरीचे चेअरमन प्रशांत कदम आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार किशोर वांढेकर यांनी मानले.