बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे वै. गुरुवर्य हभप शिवराम महाराज रिंधे यांच्या १०५ व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वै. हभप शिवराम महाराज रिंधे व संत रेवूबाई खराडे यांच्या सत्य घटनेवर आधारित ‘साक्षात्कार’ या मराठी चित्रपटाचा शुभारंभ माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात करण्यात आला. या चित्रपटाची, कथा, पटकथा संवाद कैलास महाराज रिंधे यांनी लिहिले असून या चित्रपटाचे दिग्दर्शन कृष्णा रा. शरणागत (नटराज फिल्म क्रिएशन) हे करणार आहेत. यावेळी सरपंच महेशराजे म्हस्के, बाळासाहेब रिंधे, आण्णासाहेब म्हस्के, अॅड. अजय रिंधे, रामदास खराडे नानासाहेब खराडे, प्रकाश उगले, रावसाहेब खराडे, संभाजी म्हस्के, अजित खराडे, आप्पा बागरे, संभाजी खराडे, रामभाऊ मामा ताके, दत्तात्रय ताके, सर्जेराव ताके, शरद जाधव, चंदूभाऊ ताके, संताराम गवारे, राधाकिसन घुगरे, महेश खराडे, गौतम रिंधे इंजिनियर, कानडे सर, महेश उगले, मंगेश उगले आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी हभप कैलास महाराज रिंधे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
