बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तळ कोकणच्या आईचा यात्रा उत्सव गुरुवर्य तुळशीराम अण्णा कोकरे यांच्या आशीर्वादाने व शंकरभाऊ मुंगसे यांच्या अधिपत्याखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक सोनू दादा साठे यांच्या मधुर आवाजातून गीत बहाराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तर पारंपारिक गजढोल, गजनृत्यचा खेळ मोठ्या उत्साहात पार पडला.
आषाढ महिन्यात देवी आईचा यात्रोत्सव असल्याने येथे पोतराज येऊन त्यांनीही आपली भक्ती मोठ्या उत्साहात पार पाडली. तसेच किन्नर समाजातील काहींनी येऊन त्यांनी आपल्या नृत्यातून देवीची पूजा केली.
यावेळी हजारो भाविक मोठ्या भक्ती भावाने येऊन देवीची पूजा अर्चा करीत असतात .या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून भाविकांनी हजेरी लावली होती. ही नवसाला पावणारी देवी आहे असे आख्यायिका भाविक मानत आहेत.
त्यामुळे नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने व आपल्या श्रद्धेने या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. यात्रेनिमित्त सकाळपासूनच अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला.
यावेळी परिसरामध्ये विद्युत रोषणाई व पुष्पमालेच्या व पुष्पांच्या माध्यमातून मोठी सजावट करण्यात आली होते. यात्रा उत्सव निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी देवराव मुंगसे, पाटीलनाना मुंगसे, कोंडीराम मुंगसे, गंगाधर मुंगसे यांनी सहकार्य करत विशेष परिश्रम घेतले.
