स्व. आसराबाई रायभान तांबे यांचे शनिवारी प्रथम पुण्यस्मरण

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील स्व. आसराबाई रायभान तांबे यांचे प्रथम पुण्यस्मरण शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता होत आहे. बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती येथे या पुण्यस्मरणानिमित्त रामायणाचार्य श्री समाधान महाराज शर्मा (रामकृष्ण परमहंस केज) यांची कीर्तनसेवा होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन दत्तात्रय रायभान तांबे (मुलगा), हरिभाऊ रायबान तांबे (मुलगा), सुमन रावसाहेब गायकवाड (मुलगी), जिजाबाई कोंडीराम गायकवाड (मुलगी), संगीता कडूबाळ शिंदे (मुलगी), मीना भास्कर शिंदे (मुलगी), सागर दत्तात्रय तांबे (नातू) व समस्त तांबे परिवार यांनी केले आहे.