धर्मध्वजारोहनाने ज्योतिर्लिंग देवस्थान येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गोयकर वस्ती (गारमाथा) येथे ज्योतिर्लिंग देवस्थानचा अखंड हरिनाम सप्ताहास हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप प्रदीप महाराज वाघमोडे व हभप सदाशिव महाराज पुंड यांच्या शुभहस्ते धर्मध्वजारोहणाने या सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. यावेळी विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे व आलेल्या भजनी मंडळाच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. या सप्ताहात हभप सुखदेव महाराज मुंगसे, सूर्यभान महाराज केसभट, आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड) व प्रदीप महाराज वाघमोडे यांची किर्तनसेवा पार पडणार आहे.

तर काल्याची किर्तनसेवा सुरेशानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. दररोज सकाळी व सायंकाळी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या धर्म ध्वजारोहणप्रसंगी सरपंच चंद्रकांत मुंगसे, चेअरमन बाबासाहेब मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, हभप एकनाथ महाराज वाघमोडे, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे,

महादेव मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, हभप पांडुरंग महाराज रक्ताटे, सुभाष महाराज मुंगसे, पत्रकार इंनुस पठाण, हरिभाऊ देशमुख ,बाळासाहेब मुंगसे, पाचुंदा भजनी मंडळ, देडगाव भजनी मंडळ आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा अखंड हरिनाम सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्योतिर्लिंग तरुण मंडळ, गोयकर, चोपडे, देवकाते, काळे, होंडे परिवार विशेष कष्ट व परिश्रम घेत आहेत.