बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील आयोजित ७९ व्या स्वातंत्रदिन सोहळ्यात सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक संतोष उल्हारे प्रास्ताविकातून मान्यवरांचे स्वागत केले. तर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला.
यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची प्रभात फेरी भारत माता की जय, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशा देशभक्तीपर घोषणांनी बालाजी मंदिर मार्गे शाळेत पोहोचली. त्या ठिकाणी स्वातंत्र्यदिनाची मोठी तयारी करण्यात आली होती. आलेल्या मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक सतीशकुमार भोसले यांनी केले. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगते, गीते, नाटक सादर करून स्वातंत्र्य सेनानीच्या कार्याची आठवण करून दिली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून ऐक्य, त्याग आणि प्रामाणिकपणाचा संदेश देण्यात आला. यावेळी युवा उद्योजक नितीन हिवाळे यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवस निमित्त शाळेला विद्यार्थी कवायातसाठी डंबेल्स दिल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच सोमनाथ ससाने यांनी ही देणगी दिल्याने तसेच माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे यांनी कायम सहकार्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी बथूवेल हिवाळे सरांकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, गोरक्षनाथ नांगरे गुरुजी, बन्सी पाटील मुंगसे, माजी सैनिक संजय काळे, सोमनाथ मुंगसे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुनील मुथ्था, महादेव पुंड, सोसायटीचे व्हाईस चेअरमन जनार्धन देशमुख, पत्रकार युनूस पठाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत ससाने, बळीराजा संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, भाजपा तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे, दत्ता पाटील मुंगसे, संभाजी काजळे, अरुण वांढेकर, युवा नेते पोपट बनसोडे, रामचंद्र कदम, अन्वर सय्यद, संपत ससाने, नागेबाबा मल्टीस्टेटचे शाखाधिकारी पांडुरंग एडके, राजू देवा तांदळे, शरद हिवाळे, मधुकर देवा तांदळे, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक दत्तात्रय धामणे, बथूवेल हिवाळे, आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत, आश्विनी कदम, करांडे मॅडम, कदम मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
