चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरात नांगरे परिवाराच्या हस्ते महाअभिषेक

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील प्रसिध्द अशा महादेव मंदिर येथे सोमवारी (दि.१८) चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त हस्तरेषातज्ञ कै. कनकमलजी मुथ्था यांच्या कृपाशिर्वादाने व महादेव मंदिर येथे कैलासनाथ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नांगरे परिवाराच्या वतीने महाअभिषेक करण्यात आला.
येथील महादेव मंदिर येथे कैलासनाथ मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षक तबला विशारद प्रा. संदिप नांगरे सर व सौ. सुलभा संदिप नांगरे या दाम्पत्याच्या हस्ते महाअभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर नांगरे परिवाराच्या वतीने उपस्थित भाविकांना खिचडी वाटप करण्यात आले. यावेळी माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, कैलासनाथ मित्रमंडळाचे राजू कदम, विठ्ठल क्षिरसागर, अरुण वांढेकर, हरिभाऊ मुंगसे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी संदिप नांगरे सर व अनिकेत क्षिरसागर यांचा विशेष योगदानाबद्दल कैलासनाथ मित्रमंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, हरिभाऊ जाधव, देवकाते मेजर, आकाश चेडे आदी उपस्थित होते. यावेळी हजारो भाविकांनी आरती व प्रसादाचा लाभ घेतला.