बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल देडगाव या शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व यांनी घेतलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीमध्ये आदित्य प्रदीप पवार हा विद्यार्थी पात्र झाला असून इयत्ता आठवी मध्ये सिद्धार्थ संदीप म्हस्के व श्रेयशी कैलास कोलते हे विद्यार्थी पात्र झालेले आहेत. सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यानी विशेष गुणांसह ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मन्वंतर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ.विजय कदम, संचालिका शुभांगी मॅडम, समन्वयक कल्पना मॅडम, स्कूलचे प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक यांनी अभिनंदन केले आहे. शिक्षकांच्या परिश्रमाचेच हे प्रतिबिंब आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी प्रा. डॉ. विजय कदम यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले. परिसरातील ग्रामस्थ व पालक यांचेकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
