तक्षशिला ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- तक्षशिला ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची एचएससी परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी याही वर्षी कायम राहिली आहे. क्रॉप सायन्स या विषयांमधून काळे कुणाल दत्तात्रय याने 86.83 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. वांढेकर प्राची रवींद्र 86.50 टक्के द्वितीय क्रमांक, पाटील राजनंदिनी अजय 82.67 टक्के हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. पवार ध्रुव महेश 82 टक्के चतुर्थ क्रमांक, मंडलिक अनुष्का अजित 81.67 टक्के, देशमुख श्रावणी जितेंद्र ८०.३३ टक्के गुण मिळवून यशस्वी कामगिरी केली आहे. तसेच प्लेन सायन्स मध्ये खालील विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश मिळवले आहे. मुनोत श्रवण आदेश 86.83 टक्के प्रथम क्रमांक, कोलते श्रावणी सुभाष 85.17 टक्के द्वितीय क्रमांक, घाडगे तनिष्का विनोद 84.83 टक्के तृतीय क्रमांक, शेटे प्राजक्ता राजेंद्र 84.83 टक्के चतुर्थ क्रमांक, तांबे श्वेता अजित 83.17 टक्के, मालुंजकर यश अनिल 83.17 टक्के पाचवा क्रमांक मिळविला आहे. विभागून लष्करे आदित्य रोहिदास 82.83 टक्के, शिंदे श्रेया संजय 82.83 टक्के, शेंडगे आनंदी कैलास 82.33 टक्के, घुले भक्ती दत्तात्रय 81.50 टक्के, घोडके साक्षी ज्ञानदेव 80.83 टक्के, कुटे श्रद्धा रमेश 80.83 टक्के, कर्डिले सौरभ दिगंबर 80.33 टक्के, रक्ताटे सुप्रिया नवनाथ 80.17 टक्के या विद्यार्थ्यांनी यष मिळवले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय कदम, संचालिका शुभांगी विजय कदम, समन्वयक कल्पना पवार, प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.