बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे तिसगाव अर्बन संस्थेद्वारे परिसरातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी हभप महंत सुनीलगिरीजी महाराज (श्रीराम साधना आश्रम) तसेच सरपंच, उपसरपंच ,सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य आदी ग्रामस्थ उपस्थित होते.तिसगाव अर्बन 2 मे 2022 पासून बालिका समृद्धी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देत आहे. तिसगाव अर्बनच्या या उपक्रमामुळे कित्येक विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. कार्यक्रमास उपस्थित महंत सुनीलगिरीजी महाराजांनी याप्रसंगी बोलताना तिसगाव अर्बनच्या आजवरच्या केलेल्या सामाजिक, धार्मिक कार्याचे कौतुक केले. संतांचे विचार व त्यांची शिकवण मणी ठेवून तिसगाव अर्बन नेहमी कुठल्याही अध्यात्मिक कार्यात अग्रेसर असते. तसेच ही संस्था खऱ्या अर्थाने ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरलेली आहे, असे सांगितले.
शेतकरी व्यापारी वर्गास अधिकाधिक बँकिंग ऑनलाइन सुविधा देण्यासाठी तसेच कर्जदार व ठेवीदारास अधिकाधिक सुरक्षा देण्यासाठी तिसगाव अर्बन लवकरच मल्टिस्टेटमध्ये रुपांतरीत होत असून देडगाव येथे शाखा नं- 07 लवकरच आपल्या सेवेसाठी सुरू होत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सुनील शिरसाठ यांनी यावेळी बोलताना दिली.