बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुका लॉयर्स कंझ्युमर को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनपदी अॅड. गोकुळ भताने यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .तर दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश वाघमारे साहेब यांचे हस्ते व्हाईस चेरमनपदी निवड झालेले ॲड. भाऊसाहेब काळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मावळते चेअरमन अॅड. एम. आर. कुटे व व्हा. चेअरमन अॅड. बी.एस. शिरसाठ यांचा देखील सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव तसेच दुसरे सत्र न्यायाधीश एच .आर .वाघमारे तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जी.बी. यादव तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सुगावकर मॅडम, तसेच सरक मॅडम, आणि जाधव मॅडम तसेच नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. कल्याण पिसाळ, ज्येष्ठ सदस्य अॅड. बी एस काळे, अॅड. गणेश निकम, अॅड. कैलास शिंदे, अॅड. अजय रिंधे, अॅड. बाळासाहेब चव्हाण, अॅड. उत्कर्षा मोटे मॅडम, अॅड.बी .एस शिरसाठ, अॅड. एम आर कुटे, अॅड. प्रशांत माकोणे, अॅड. वैभव वाकचौरे, अॅड. दिनकर घोरपडे, अॅड. काका गायके, अॅड. चंद्रकांत कदम, अॅड. रविंद्र गव्हाणे, अॅड. एस एस सकट तसेच सर्व वकील बांधव उपस्थित होते. वकील संघातर्फे सर्वांचा सत्कार तसेच अल्पोपहाराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. बी. जे. चव्हाण यांनी केले.
