वंचित बहुजन आघाडीच्या नेवासा तालुका संघटकपदी उत्तम सकट यांची निवड

ब्रेकिंग न्यूज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका नवनिर्वाचित पदनियुक्ती सत्कार समारंभ नेवासा फाटा येथे संपन्न झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेवासा तालुका संघटकपदी देडगाव येथील उत्तम सकट यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल तालुका संघटक उत्तम संकट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थित उत्कर्षाताई रुपवते (राज्य प्रवक्ते) व विजय अंकल गायकवाड (जिल्हा उपाध्यक्ष), सुनिल ब्राम्हणे (सचिव), प्रविणभाऊ आल्हाट ( युवक जिल्हाध्यक्ष), वर्षाताई बाचकर (महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), सचिन बनसोडे (युवक जिल्हाध्यक्ष), विशालभैय्या कोळगे (जिल्हाध्यक्ष), पोपटराव सरोदे (नेवासा तालुका अध्यक्ष), अनिल जाधव सर (जिल्हा महासचिव), राजुभाऊ साळवे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते), निलेश जगधने ( युवा जिल्हा प्रवक्ते), छायाताई दुशिंग (महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष) या समस्त राज्य व जिल्हा कमिटीचे नेतृत्वाखाली नेवासा तालुका वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित पदनियुक्ती व सत्कार समारंभ झाला, यावेळी विविध पदे देण्यात आले.
नवनियुक्त तालुका अध्यक्ष पोपट सरोदे यांच्या मार्गदर्शनाने पुढील पदे देण्यात आले. वंचित बहुजन आघाडी कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. बाबासाहेब कावळे, अ‍ॅड. अशोक थोरात, अ‍ॅड. देवधान साळवे, अ‍ॅड. किरण सरोदे ,तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जिल्हा अध्यक्षपदी बादल परदेशी व तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी सुरेश घुगासे यांची निवड करण्यात आली. तसेच फादर बॉडी नेवासा तालुकाध्यक्ष पोपट सरोदे ,तालुका उपाध्यक्ष नानाभाऊ खंडागळे, उपाध्यक्ष राजेंद्र साळवे ,उपाध्यक्ष मुबारक शेख ,उपाध्यक्ष गोरक्ष बर्वे, संघटक माजिद शेख, संघटक बबन आल्हाट ,संघटक शहाजी पठारे, संघटक उत्तम सकट, तालुका संघटक गटनेते अंतोन गोरडे, भाऊसाहेब जगदाळे, उत्तम बोर्डे, बाळासाहेब शेलार या सर्वांचे गटनेतेपदी नियुक्ती, तसेच तालुका प्रवक्ता गोरक्ष शेरे, सुरज सातदिवे ,अनिल महाकाळ या सर्वांचे तालुका प्रवक्ता तसेच यावेळी तालुका युवक अध्यक्षपदी संतोष कासोदे, उपाध्यक्ष महेश मोरे ,उपाध्यक्ष दीपक सरोदे, उपाध्यक्ष अमोल पाटेकर ,उपाध्यक्ष आदिनाथ गाढवे, तालुका संघटक संदीप क्षीरसागर, संघटक नितीन केदार, संघटक रवी कांबळे, राजू साळवे, तालुका प्रवक्ता शिवाजी शिंदे ,तालुका प्रवक्त सचिन शिरसाट, प्रवक्ता आकाश इंगळे ,योगेश गायकवाड, सुरेश आढाव यांची प्रवक्तापदी नियुक्ती करण्यात आली. महासचिव आदिनाथ भालेराव, सचिव आयुब शेख, सहसचिव विकास पिसाळ, खजिनदार नितीन गोर्डे, तालुका प्रवक्ते सुनील हिवाळे, महिला आघाडी ललिता हिवाळे, तालुका प्रवक्ता डॅनियल देठे, महासचिव उदय करडक, महासचिव संदीप काकडे, सचिन नामदेव बनसोडे, महासचिव दामोदर शिंदे, तालुका खजिनदार कडूबाळ साहेब या सर्वांची नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.