जनशक्ती (वृत्तसेवा)- ख्रिसमस नाताळनिमित्त तालुक्यातील कुकाणा, चिलेखनवाडी, तरवडी, काळेगाव, पिंपरी शहाली, वाकडी, वरखेड येथील चर्चमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांनी भेट देत नाताळनिमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या. अब्दुलभैय्या शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेवासा तालुक्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मानिमीत्त केक वाटप करण्यात आले.
तसेच सर्वधर्म समभाव जपण्याचा संदेश यावेळी अब्दुलभैय्या शेख यांनी उपस्थितांना दिला.
याप्रसंगी कुकाणा येथील ऑईल मिल चर्चमध्ये अब्दुलभैय्या शेख, पास्टर यहोशवा मोहिते, बापुसाहेब पवार, मकरंद राजहंस, सतीश कावरे, सुमन मोहिते, आशा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
