बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील ग्रामदैवत असलेल्या मंकावती मातेच्या यात्रेनिमित्त माका ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व ग्रामस्थांच्या वतीने खास महिलांसाठी आयोजित उद्धव काळापहाड संचलित खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. त्यामध्ये प्रथम बक्षीस असलेल्या सोन्याची नथच्या मानकरी सुप्रिया सचिन लांडगे या ठरल्या. तर द्वितीय बक्षीस कुलरच्या मानकरी भक्ती विजय देवकाते या ठरल्या. तर तृतीय बक्षीस मिक्सरच्या मानकरी हर्षदा गजानन घुले या ठरल्या. तसेच उत्तेजनार्थ 21 महिलांना येवला पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये 275 महिलांनी सहभाग नोंदवला. तसेच या कार्यक्रमासाठी सुमारे 1000 महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर महिलांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमिटी, सरपंच विजयाताई पटेकर, उपसरपंच अनिलराव घुले, ग्रामपंचायत सदस्य अमोल पालवे, ज्ञानदेव पागिरे, बबन भुजबळ, सुनील शिंदे, गोकुळ भिमराज लोंढे, सोपान घुले भाऊसाहेब शिरसाठ, विविध विकास सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संजय गाडे, व्हा. चेअरमन बाळासाहेब भानगुडे, संचालक सुरेश तवार, श्रीधर लोंढे, मल्हारी आखाडे, जबाजी पांढरे, रघुनाथ पागिरे, आबासाहेब पालवे, बाबासाहेब कोकाटे, त्रिंबक दारकुंडे, सुभाष घुले, कडूचंद कोकाटे गुरुजी, पोलीस पाटील अशोकराव वाघमोडे, मुरलीधर रुपनर, शिवसेना तालुका संघटक गोकुळ लोंढे, ज्ञानदेव सानप सर, संजय आखाडे, मच्छिंद्र लोंढे, डॉ. बाळासाहेब शिंदे, संजय खेडकर, दिगंबर शिंदे, संजय भानगुडे, देविदास धनवटे, जनार्दन धनवटे, रामभाऊ बाचकर, शंकर गुलगे, दीपक आखाडे, शहादेव लोंढे तसेच समस्त ग्रामस्थ माका यांनी विशेष परिश्रम घेतले.
