बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तेलकुडगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त तीन दिवसीय ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात ग्रामस्थांचे सहकार्य व यात्रा कमिटीच्या योग्य नियोजनातून भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला. महाशिवरात्रीनिमित्त हभप नंदकिशोर महाराज खरात यांची किर्तनसेवा झाली व तद्नंतर यजमान मंडळी यांच्या वतीने महाफराळ पंगत झाली. गुरुवारी सकाळी चैतन्य नागनाथ महाराजांच्या मुर्तीस भाविकांनी गंगेवरून पायी कावडीने पाणी आणत ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराजांना गंगाजल स्नान घातले. चांगली सजावट असणाऱ्या PSI प्रतिक,सहकारी, बाळकृष्ण, ऋषिकेश, सुरज या कावडीधारकांना बक्षिस दिले. रात्री देवाची छबीना मिरवणुक, व शोभेच्या दारूची जबरदस्त आतिषबाजी ग्रामस्थांना पहायला मिळाली नंतर राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या मंगलाताई बनसोडे लोकनाट्य तमाशा शांततेत पार पडला. नंतर रात्री देवाचा जागर म्हणून सेवक पातळे परिवार वतीने जागरण गोंधळ संपन्न झाले.
शनिवारी सकाळी हनुमान मंदिरासमोर यात्रेतील शोभा वाढविणारे कलाकसरतकाराना, हजेरी कार्यक्रमात बिदागी देण्यात आली. आणि दुपारनंतर सर्वात मुख्य म्हणजे समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्यातुन दुपारी ३ ते रात्री कुस्त्यांसंपेपर्यंत मैदान सुरू राहिले. समस्त ग्रामस्थ मंडळी व यजमान मंडळी यांच्या सहकार्यातुन यात्रोत्सवाबरोबर श्री चैतन्य नागनाथ क्रीडा संकुल श्रीरामनगर येथे नामांकित राष्ट्रीय मल्लांच्या कुस्त्यांचा जंगी हगामा संपन्न झाला. यावर्षी तीन ते चार लाख रुपयापर्यत नामांकित व ऐनवेळी येणाऱ्या मल्लांच्या नावनोंदणी करुन भव्यदिव्य असे चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सव कमिटी व पंचकमिटीने उल्लेखनीय व कौतुकास्पद असे आयोजन व नियोजन करण्यात आले. १) पहिल्या ३१००० रुपयांच्या कुस्तीचा मानकरी ठरलेला पैलवान देवकाते व पै.चेतन रेपाळे यांच्या कुस्तीसाठी शिक्षणमहर्षी मेजर साहेबरावजी घाडगे पाटील यांनी ३१ हजार रुपयांचे बक्षीस दिले २) कुस्तीसाठी स्व.जगन्नाथ केशव काळे भाऊ यांच्या स्मरणार्थ श्री.रेवन्नाथ जगन्नाथ काळे मा.सरपंच सई कृषी सेवा यांनी २१०००/ रुपये बक्षीस दिले ३). कुस्तीसाठी स्व.कोंडीराम घोडेचोर यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ कोंडीराम घोडेचोर मा.सरपंच यांनी १५०००/रुपये बक्षीस दिले ४). कुस्तीसाठी स्व.भाऊराव देवराव काळे भाऊ यांच्या स्मरणार्थ श्री भारत पाटील काळे (मा. उपसरपंच, औदुंबर कलेक्शन) यांनी १११११/ रुपये बक्षीस दिले. ५)स्व. सुखदेव यादव गटकळ यांच्या स्मरणार्थ श्री बाळासाहेब गटकळ सर व राजेंद्र गटकळ यांनी ११०००/. रुपये बक्षीस दिले. ६). कुस्तीसाठी स्व.रामभाऊ सूर्यभान काळे (अण्णा) यांच्या स्मरणार्थ श्री महेशराजे चंद्रकांत काळे यांनी ७०००/ बक्षीस दिले ७). कुस्तीसाठी श्री सुरेश कारभारी काळे मा.सरपंच यांनी ६०००/रुपये बक्षीस दिले. ८) कुस्तीसाठी प्रा मधुकरजी घाडगे सर व PSI प्रतिक घाडगे यांनी ५५५१/ व मेजर साहेबरावजी घाडगे पाटील यांनी पै. नवीन मोर साठी स्वतंत्र ५०००/ रुपये दिले ९). कुस्तीसाठी स्वर्गीय गोविंद पा. काळे व स्व. सुभद्राबाई काळे यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर भाऊसाहेब काळे सोसायटीचे मा.चेअरमन यांनी ५०००/. रुपये बक्षीस दिले १०). कुस्ती साठी सोसायटीचे मा.चेअरमन श्री काकासाहेब बाजीराव काळे यांनी ५०००/ रुपये बक्षीस दिले ११). कुस्तीसाठी स्वर्गीय किसनराव पा गटकळ यांच्या स्मरणार्थ श्री हरिचंद्र किसनराव गटकळ (गटकळ परिवार ट्रॅक्टर) यांच्याकडून ५०००/.रुपये बक्षीस दिले १२). कुस्ती साठी स्व.रामभाऊ सूर्यभान काळे यांच्या स्मरणार्थ श्री बाबासाहेब श्रीपती घोडेचोर यांनी ५०००/. रुपये बक्षीस दिले १३). कुस्तीसाठी प्रा.श्री विकासजी काळे सर व श्री बाळासाहेब काळे सर यांनी ५०००/ रुपये बक्षीस दिले १४). स्व.वसंत रामभाऊ सरोदे यांच्या स्मरणार्थ श्री करण व सागर सरोदे यांनी मा.सरपंच पोपटराव सरोदे हस्ते ५०००/.रुपये बक्षीस दिले.
आणि नामांकित राष्ट्रीय स्तरावरती खेळलेल्या मुलीच्या १ ते ५ कुस्त्यासाठी शिक्षणमहर्षी मेजर साहेबरावजी घाडगे पाटील संस्थापक त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान यांनी एकुण २८५५१ रुपयांचे बक्षीस श्री.पांडुरंग हरिभाऊ घाडगे अण्णा यांच्या हस्ते दिले. जंगी कुस्त्यांचा हगामासाठी संदीप निकाळजे सर, सोपानरावजी काळे सर, पोपटराव काळे सर, विकास काळे सर, बापू गटकळ सर, बाळासाहेब काळे सर, आबासाहेब घाडगे सर, कर्डिले सर, काकडे सर, श्री.सतीशराव काळे सरपंच, शरदराव काळे उपसरपंच, म्हातारदेव काळे, बाळू हंडाळ, यांनी कुस्त्यासाठी पंचकमिटी म्हणून काम पाहिले. तसेच चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने सतिशराव काळे सरपंच, शरद काळे उपसरपंच, बालकनाथ काळे मा.सरपंच, कानिफनाथ घोडेचोर उपसरपंच, सुरेश काळे साहेब मा सरपंच, एकनाथ घोडेचोर उपसरपंच, अशोक काळे उपसरपंच, नारायण पा.काळे, सुर्यभान घोडेचोर, ज्ञानेश्वर काळे मा.चेअरमन, रेवन्नाथ पा. काळे मा.सरपंच, साईनाथराव काळे, भारत काळे मा.उपसरपंच, बाबासाहेब काळे, आत्माराम घोडेचोर, श्रीकृष्ण घाडगे, मोहनराव काळे, बाबासाहेब घोडेचोर, अरुण पा.घाडगे चेअरमन, भाऊसाहेब काळे, पृथ्वीराज गटकळ,आदिनाथ धोरात, प्रसाद घोडेचोर, रुपचंद गटकळ, अभिमन्यू काळे, छानदेव घोडेचोर, पोलीस पाटील श्री.शिवाजी घोडेचोर, सचिव अर्जुन गायकवाड, विलास काळे, जनार्दन गटकळ, हनुमंत गटकळ, रमेश काळे, रघुनाथ काळे, लक्ष्मण काळे, संजय घोडेचोर, नामदेव म्हस्के, तुळशीराम काळे भाऊ, शैलेश देवा, संजय घाडगे, दादासाहेब काळे, संतोष काळे, सुनील राजहंस, सुदाम काळे, अक्षय घाडगे, रविंद्र काळे, बाळासाहेब काळे, कचरु गायकवाड, आजीनाथ काळे, संभाजी घोडेचोर, संपत घाडगे, गणेश घाडगे, आकाश मिसाळ संतोष सरोदे, माळी राहुल, आदि. मान्यवरांनी परिश्रम घेतले
ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराजांच्या यात्रोत्सवातील मुख्य आकर्षण ठरलेले कावडी मिरवणूक, लेझीम पथक, जंगी कुस्त्यांचा हगामा, तमाशा असे विविध कार्यक्रम, ज्यांच्यामुळे हा यात्रोत्सव भव्यदिव्य स्वरूपात यशस्वी करु शकलो असे आर्थिक सहकार्य करुन परिश्रम घेणारे स्वंयसेवक, सर्व ग्रामस्थ मंडळी, भाविक, तरुण बांधव, कुस्त्यांचे यजमान, हितचिंतक यांचे चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सव कमिटीच्या वतीने श्री. सतिशराव काळे पाटील सरपंच व शरदराव काळे उपसरपंच यांनी मनःपूर्वक आभार मानले.