देडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बैलगाडा शर्यत उत्साहात

ब्रेकिंग न्यूज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली. या बैलगाडा शर्यतीमध्ये बिनजोडमध्ये लक्ष्मण आयनार (शिर्डी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर कोकरे (फत्तेपूर) यांनी द्वितीय क्रमांक पटवला. तर बबनराव लंघे पाटील (दोन्ही गाडी), लक्ष्मणराव पांढरे, देवगड (बिनजोड) ऋषीशेठ भगत, मांजरी (बिनजोड) यांनी बक्षीस मिळवले. या कार्यक्रमाला प्रथम बक्षीस रुपये ११,१११/- श्री बालाजी ज्वेलर्सचे मधुकर क्षीरसागर व विठ्ठल क्षीरसागर यांच्या वतीने देण्यात आले. तर द्वितीय बक्षीस निलेश कोकरे व ॲड. कुणाल शिंदे यांच्या वतीने, तृतीय बक्षीस माजी सरपंच रामेश्वर गोयकर, श्रीकांत हिवाळे, चांगदेव टकले आकाश चेडे यांचे वतीने तर चतुर्थ बक्षीस सेवा संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे सर, चंद्रकांत बनसोडे, पोपट बनसोडे यांच्या वतीने देण्यात आले. तसेच प्रत्येक गाडीला प्रोत्साहनपर दीड हजार रुपये देण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीचे पप्पूशेठ भिसे, सचिन गोयकर, युवा नेते निलेश कोकरे यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी हभप बाबासाहेब महाराज शिंदे (पाचुंदा), सोपानराव पांढरे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, माजी चेअरमन संदेश मुंगसे, गणेशराव होंडे, माजी चेअरमन बुधाजी गोयकर, गहिनीनाथ पठाडे, चंद्रकांत बनसोडे, कैलासदेवा गोयकर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मुंगसे, राजेंद्र भानुदास चोपडे, कमळाकर गोयकर, एकनाथ गोयकर, विठ्ठल काळे, दत्तू भिसे, बलभीम सकट, कडूबाळ ससाणे, कैलास काळे, बाबासाहेब मुंगसे, अक्षय ससाणे, अजय ससाणे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रसाठी पै. संभाजी टकले, पै. रामभाऊ टकले, पै. एकनाथ फुलारी, श्रावण औटी, अक्षय वाघमोडे नारायण कोकरे, अभय तांबे, पोपट बनसोडे यांचे विशेष सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युवा नेते निलेश कोकरे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.