बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे वै. गुरुवर्य हभप शिवराम महाराज रिंधे यांच्या १०५ व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वै. हभप शिवराम महाराज रिंधे व संत रेवूबाई खराडे यांच्या सत्य घटनेवर आधारित ‘साक्षात्कार’ या मराठी चित्रपटाचा शुभारंभ उद्या सोमवारी (ता.२१) सकाळी ८.३० वाजता आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या शुभहस्ते जेऊर हैबती येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे होणार आहे. या चित्रपटाची, कथा, पटकथा संवाद कैलास महाराज रिंधे यांनी लिहिले असून या चित्रपटाचे दिग्दर्शन कृष्णा रा. शरणागत (नटराज फिल्म क्रिएशन) हे करणार आहेत. यावेळी ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संचालक प्रा. नारायणराव म्हस्के सर, सरपंच महेशराजे म्हस्के, माजी सरपंच बाळासाहेब रिंधे, संतोष म्हस्के, आण्णासाहेब म्हस्के, अॅड. अजय रिंधे, बाळासाहेब महाराज रिंधे, खराडे सर, शिवाजी कानडे सर, रावसाहेब खराडे, अरुण मिसाळ, खराडे सरपंच, गोरखराव कानडे, शिवाजी रिंधे, संभाजी खराडे, जगन्नाथ शिंदे, शरद शिंदे, संभाजी रिंधे, महेश खराडे, महेश उगले, इंजिनियर गौतम रिंधे, आबासाहेब रिंधे, उद्धव रिंधे, रघुनाथ म्हस्के, संकेत नवले, दामोदर रिंधे, दिगूदादा रिंधे, अशोक आप्पा खराडे, चंदूभाऊ ताके, दिलीप ताके, अशोक धायगुडे, मेजर बाळासाहेब मुरकुटे जेऊर, सोमनाथ ताके, दिगूभाऊ ताके, नितीनराव रिंधे, संभाजी म्हस्के, रामदास म्हस्के ,भारत रिंधे, संताराम गवारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हभप कैलास महाराज रिंधे यांनी केले आहे.
