ज्योतिर्लिंग देवस्थान येथील अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गोयकर वस्ती (गारमाथा) येथील ज्योतिर्लिंग देवस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरेशानंदगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने उत्साहात सांगता झाली. यावेळी देडगाव व परिसरातील भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप प्रदीप महाराज वाघमोडे, हभप सदाशिव महाराज पुंड, हभप एकनाथ महाराज वाघमोडे आदी संत महंत व मान्यवरांची या सप्ताहास उपस्थिती लाभली. या सप्ताह काळात हभप सुखदेव महाराज मुंगसे, सूर्यभान महाराज केसभट, आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड) व प्रदीप महाराज वाघमोडे यांची किर्तनसेवा पार पडली. दररोज सकाळी व सायंकाळी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी ज्योतिर्लिंग तरुण मंडळ, गोयकर, चोपडे, देवकाते, काळे, होंडे परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.