बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- विश्वविक्रम प्रस्थापित नागेबाबा मल्टीस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संस्थेचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा प्रत्येक सभासद आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, सक्षम झाला पाहिजे, यासाठी सतत प्रयत्नशील असते. श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट शाखा देडगाव (ता.नेवासा) येथील जगदंबा महिला बचत गट कर्जदार बेबीताई गुलाब साळवे यांना रुरल डेव्हलपमेंट अंतर्गत बचत गटाचे कर्ज दिले होते. त्यांचे पती गुलाब दामोदर साळवे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे कर्ज हप्ते रेग्युलर होते. त्यामुळे त्यांची कर्ज रक्कम 60000/- रुपये कर्ज संस्थेतर्फे माफ करून कुटुंबीयांना नील दाखला देण्यात आला. यावेळी बालाजी देडगावचे माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, अंबादास मुंगसे, आसाराम जावळे, जालिंदर तिडके, ज्ञानदेव मुंगसे, अशोक गडाख, बचत गटातील महिला सदस्य, नागेबाबा संस्थेचे डेव्हलपमेंट ऑफिसर एकनाथ नांदे, देडगाव शाखेचे शाखाधिकारी पांडुरंग एडके, विक्रम देशमुख आदी उपस्थित होते.
