तिसगाव अर्बनची देडगाव व शेवगाव शाखा लवकरच सेवेत: शिरसाठ

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात 365 दिवस सेवा देणारी तिसगाव अर्बन ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. साधू-संतांची शिकवण व त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या या संस्थेने विविध सामाजिक,अध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रात आजवर उल्लेखनीय कार्य केले आहे. संस्थेच्या विविध योजना अंतर्गत ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक मदत तसेच हेल्थ कार्ड व विमा योजनेअंतर्गत अनेक गरजवंतांना सेवा पुरवण्याचे कार्य तिसगाव अर्बन आजवर सातत्याने करत आहे. अनेक धार्मिक कार्यात मनोभावे सेवा करणारी ही संस्था आपल्या उज्वल भविष्यासाठी अधिकाधिक अत्याधुनिक बँकिंग सेवा सुविधा पुरवण्यासाठी लवकरच एका नवीन नाव रुपात मल्टीस्टेट मध्ये रूपांतरित होत आहे. तसेच तिसगाव अर्बन शाखा देडगाव व शाखा शेवगाव लवकरच आपल्या सेवेत सुरू करत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सुनील शिरसाठ यांनी दिली. तिसगाव अर्बन सध्या तिसगाव, पाथर्डी, कोरडगाव, ढोरजळगाव, तेलकुडगाव भातकुडगाव या ठिकाणी कार्यरत आहे.