जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सुरेगाव येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये स्वातंत्र्यदिन थाटामाटात चिमुकलेच्या उपस्थितीमध्ये तसेच अनेक राजकीय ,सामाजिक मंडळींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
स्वातंत्र्य दिन महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब गणगे होते.
यावेळी रमेश गणगे, दौलत गणगे, नामदेव गंणगे , शिवाजी गंणगे, नामदेव गंणगे, अशोक खैरे, चंद्रभान गंणगे, अशोक गंणगे, भीमराज जगताप, परसराम गंणगे, सुभाष गंणगे, राजेंद्र गंणगे, पांडुरंग गंणगे, पंढरीनाथ गंणगे, शिक्षण कमिटीचे अध्यक्ष कैलास चव्हाण ,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ कोतकर, संदीप गवारे, दादासाहेब नाबदे, मुख्याध्यापक खरे सर, अश्विनी कोतकर मॅडम, अंगणवाडी शिक्षिका निर्मला गणगे, अंगणवाडी मदतनीस अलका गणगे उपस्थित होते.
यावेळी दादासाहेब नाबदे, पंढरीनाथ कोतकर, संदीप गवारे यांनी शेतकरी संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सुरेगाव येथील समस्त नागरिक, महिला माता-भगिनी तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील मुला मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण केले. त्यामध्ये देश रंगीला आदी देशभक्तीवर गीताचे सादरीकरण करण्यात आले. संगीत कार्यक्रम सादरीकरण उत्कृष्टरित्या होण्यासाठी अश्विनी कोतकर मॅडम यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खरे सर यांनी केले. कैलास चव्हाण यांनी आभार मानले.
