बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आमदार शंकराव गडाख यांना पुन्हा विधानसभेवर पाठवून नेवासा तालुक्यामध्ये भरघोस विकासाकामे करायचे आहेत. म्हणून पुन्हा एकदा तालुक्यावर उद्धव साहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे, असे प्रतिपादन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे नागनाथ देवस्थान सभागृहामध्ये शिवसेनेचा भगवा सप्ताह शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे नाना यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष हनुमंतराव गटकळ होते. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के यांनी केले. जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपप्रमुख हरिभाऊ शेळके, मालोजीराव गटकळ, उपप्रमुख रामानंद मुंगसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाघचौरे व प्रमुख मान्यवरांचा तेलकुडगाव ग्रामस्थ व विविध संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे बोलताना म्हणाले की, नेवासा तालुक्यातील आमदार शंकराव गडाख यांना पुन्हा विधानसभेवर पाठवून नेवासा तालुक्यामध्ये भरघोस विकासाची कामे करायचे आहेत म्हणून पुन्हा एकदा तालुक्यावर उद्धव साहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. शेतकऱ्याचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी संसदेत विषय मांडून आवाज उठवला. रस्ते, विज व पाट पाण्यावर जास्त लक्ष देऊन शेतकरी सुजलाम सुफलाम होईल व शेतीमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी आवाज उठवला. यावेळी नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक प्रतीक मधुकर घाडगे यांचा खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या सप्ताहासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे , माजी उपसभापती कारभारी चेडे, मार्केट कमिटी सदस्य अरुण सावंत, विधानसभा संघटक पंकज लांबहाते, मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे ,शिवसेना तालुका उपप्रमुख सारंगधर , मुन्ना चक्रनारायण , घनश्याम लोंढे, बाबासाहेब गोल्हार, चेअरमन काकासाहेब काळे , व्हाईस चेअरमन काकासाहेब घोडेचोर, माजी सरपंच गोरक्षनाथ काळे ,माजी सरपंच भारत काळे, संभाजी काळे ,भानुदास गटकळ, हरिश्चंद्र काळे ,दिगंबर काळे ,शिवाजी घोडेचोर ,गोरक्षनाथ काळे ,संभाजी काळे ,मतदारदेव काळे, रवींद्र काळे ,मधुकर घाडगे, माजी चेअरमन अरुण घाडगे तसेच देडगाव ,पाचुंदा, माका, हिवरा , कुकाणा ,जेऊर हैबती ,देवसडे ,चिलेखनवाडी परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मिसाळ यांनी केले तर आभार महेशराजे काळे यांनी मानले.
