मोहन गायकवाड यांची प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी फेरनिवड

नेवासाफाटा (प्रतिनिधी)- नेवासा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी पत्रकार मोहन गायकवाड यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली आहे. प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीत पत्रकारांसाठी विविध उपक्रम विषयी चर्चा, विविध विषयांवरील पत्रकार परिषदांचे आयोजन आणि पत्रकार परिषदांसाठीचे नियोजन, शहरातील पत्रकारांचे प्रलंबीत प्रश्न, पत्रकारांच्या संरक्षण कायद्याचा पाठपुरावा, गेल्या अनेक […]

सविस्तर वाचा

बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सव संपन्न

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पावधीत लौकिक मिळवलेल्या कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूल माका मध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून हभप प्रदीप महाराज वाघमोडे, सहदेव लोंढे, भानुदास वाघ, शरद तिळवने, दत्तात्रय बाचकर, […]

सविस्तर वाचा

चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलचे तारे सुवर्णपदकाचे मानकरी

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील गुणवत्ता संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून लौकिक असलेली चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या 27 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. मुलुंड (मुंबई) येथील  रंगोत्सव सेलिब्रेशन मध्ये  सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, रंगभरण स्पर्धा या विविध स्पर्धा प्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी पदकांची अक्षरशः  लयलूट केली. त्यामध्ये […]

सविस्तर वाचा

नेवासा तालुक्याला भेटणार दोन लोकप्रतिनिधी; अजित पवार गटाचे अब्दुल भैय्या शेख यांच्या नावाची चर्चा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्याला दोन लोकप्रतिनिधी भेटण्याची शक्यता असून अजित पवार गटाचे अब्दुल भैय्या शेख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. महायुतीचे सर्वात कमी वयाचे उमेदवार असणारे अजित पवार गटाचे अब्दुल भैय्या शेख यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महायुतीची अधिकृत उमेदवारी आसताना देखील त्यांनी समजदारीची भूमिका घेत आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सठी फॉर्म मागे घेतला व प्रामाणिकपणे […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे संत रोहिदास महाराजांना अभिवादन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत रोहिदास महाराज मंदिरात आयोजित कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून महाराजांची आरती करण्यात आली व विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी शिक्षक संघटनेचे नेते संजयकुमार लाड सर, संत रोहिदास […]

सविस्तर वाचा

तेलकुडगावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ग्रामसचिवालया समोर आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भिमशक्ती युवा प्रतिष्ठान, तेलकुडगाव ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ, मान्यवर उपस्थित होते. यावेळी तेलकुडगाव ग्रामपंचायतचे सरपंच सतीशराव काळे, शरद काळे उपसरपंच, अशोक काळे संचालक, साईनाथ काळे मा.संचालक, कानिफनाथ घोडेचोर उपसरपंच, मालोजीराव गटकळ (शिवसैनिक-बाळासाहेब ठाकरे), अरुण पाटील […]

सविस्तर वाचा

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन

जनशक्ती (वृत्तसेवा)- भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (वय ८४) यांचं निधन झालं आहे. मधुकर पिचड यांना १५ ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची आजारपणासोबत सुरु असलेली झुंज आज संपली व त्यांची प्राणज्योत मालवली. मधुकर पिचड यांच्या निधनामुळे भाजपची मोठी हानी झाली आहे. मधुकर पिचड […]

सविस्तर वाचा

सोनई कृषि महाविद्यालयातील कृषिदुतांचे तेलकुडगावात आगमन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषि महाविद्यालय सोनई, कृषि पदवीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव या गावात दाखल झाले आहेत. दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती कृषिदूत देणार आहेत. तेलकुडगाव, […]

सविस्तर वाचा

सोनई कृषि महाविद्यालयातील कृषिदुतांचे तेलकुडगावात आगमन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषि महाविद्यालय सोनई, कृषि पदवीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव या गावात दाखल झाले आहेत. दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती कृषिदूत देणार आहेत. तेलकुडगाव, […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विश्वविक्रम प्रस्थापित श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था विविध उपक्रम राबवते. यानिमित्ताने देडगाव शाखेमध्ये नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप सय्यद बाबा पुंड महाराज यांच्या […]

सविस्तर वाचा