भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय; श्रेयस, गिल, अक्षर चमकले

जनशक्ती (वृत्तसेवा)- भारत व इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने सुमारे 12 षटके व चार गडी राखून इंग्लंडला चितपट केले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना नागपूरमध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. […]

सविस्तर वाचा

खुशखबर! सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, करदात्यांचं आठ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता 

जनशक्ती (वृत्तसेवा)- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आर्थिक पाहणी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल मांडणार आहेत. उद्या निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे.  केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला […]

सविस्तर वाचा

भारताचा विजयी ‘तिलक’; रोमहर्षक सामन्यात मारली बाजी

जनशक्ती (वृत्तसेवा)- भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका चालू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज चेन्नईतील चेपॉक मैदानावर खेळवण्यात आला. या दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडवर निसटता विजय मिळवला. भारताला 13 चेंडूंमध्ये 13 धावा काढायच्या होत्या. तिलक वर्माच्या जोरदार फलंदाजीमुळे भारताला इंग्लंडने उभारलेली धावसंख्या गाठता आली. सामन्याच्या सुरुवातीला सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी […]

सविस्तर वाचा

आजपासून नियमात बदल, खिशाला लागणार कात्री?

जनशक्ती ( वृत्तसेवा)- साल २०२४ संपले आहे. नवीन वर्षाच्या १ तारखेपासूनच अनेक दैनंदिन कामकाजाच्या गोष्टीचे नियम बदलले आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील होणार आहे. हे बदल १ जानेवारीपासून लागू होत आहेत, त्यामुळे कोणते बदल होत आहेत आणि त्याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे ते पाहूयात… एक जानेवारीपासून नवीन वर्षे सुरु झाले आहे. […]

सविस्तर वाचा

भारतीय क्रिकेट संघाचा दारुण पराभव; फलंदाजांची सपशेल शरणागती 

जनशक्ती (वृत्तसेवा)- ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात आघाडीच्या फलंदाजांच्या निष्क्रिय फलंदाजीचा फटका टीम इंडियाला बसला. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर टीम इंडियाच्या वाटेला गोलंदाजी आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 474 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव गडगडला. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने पहिल्या डावात चांगली झुंज दिली. शतकी खेळी करत भारतावरील फॉलोऑनचं संकट […]

सविस्तर वाचा

नितीशकुमार रेड्डी ऑस्ट्रेलियाला नडला; ठोकले दणदणीत शतक

जनशक्ती (वृत्तसेवा)- मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. विशेषत: नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हा दिवस गाजवला. तिसऱ्या दिवशी या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेट्ससाठी अक्षरशः रडवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 358/9 धावा केल्या होत्या. नितीश रेड्डी आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले […]

सविस्तर वाचा

भारताचा अर्थतज्ज्ञ हरपला! माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन

जनशक्ती (वृत्तसेवा)- भारताचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने काल त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांना श्वसनास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज […]

सविस्तर वाचा

तिसऱ्या कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड

जनशक्ती (वृत्तसेवा)- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला असून भारताने या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. आजचा दिवस भारतासाठी कभी खुशी कभी गम असा ठरला. शुभमन गिल आणि ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात संघाची धावसंख्या 263 धावांपर्यंत नेली. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत 171 धावात […]

सविस्तर वाचा

देशातील एक लाख तरुणांनी त्यांच्या आवडीच्या पक्षात कार्यरत व्हावं: पंतप्रधान

जनशक्ती (वृत्तसेवा)- देशभरातून १ लाख तरुणांनी पुढे येऊन त्यांच्या आवडीच्या पक्षात कार्यरत व्हावं, जेणेकरून नवीन पिढी राजकारणात येईल व त्याअनुषंगाने नवे विचारही राजकीय व्यवस्थेत दाखल होतील, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित केले. त्यांनी देशाचा विकास, कायदे आणि नियमांतील बदल यावर भाष्य केलं. भारताच्या ७८ […]

सविस्तर वाचा

लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणासाठी महाराष्ट्रातून 123 मान्यवर उपस्थित राहणार 

जनशक्ती (वृत्तसेवा)- 15 ऑगस्ट 2024 रोजी देश आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतील. आणि त्यानंतर नेहमीच्या प्रथेप्रमाणे या ऐतिहासिक स्मारकाच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतील. या निमित्ताने, नवी दिल्लीतील स्वातंत्र्यदिन 2024 च्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी भारत सरकारने देशभरातील विशेष पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 123 मान्यवर […]

सविस्तर वाचा