लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात

जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्याचे आश्वासन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार, २४ जानेवारीच्या सायंकाळपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै २०२४ च्या पावसाळी अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ […]

सविस्तर वाचा

नगरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचा मातीपूजन सोहळा उत्साहात

जनशक्ती (वृत्तसेवा)- केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नगर शहरातील कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरी वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचे मातीपूजन करण्यात आले. कुस्तीला नवे वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन मोहोळ यांनी केले. या कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे […]

सविस्तर वाचा

टक्कल व्हायरस! ‘या’ जिल्ह्यातील लोक तीन दिवसात होत आहेत टकले 

जनशक्ती (वृत्तसेवा)- बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात सध्या ‘टक्कल व्हायरस’ने धुमाकूळ घातला आहे. शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंडगाव, कालवड आणि कठोरा या गावांमध्ये केसगळतीच्या आजाराची दहशत पसरली आहे. प्रथम लोकांच्या डोक्याला खाज सुटत असून त्यानंतर तीन दिवसांत संपूर्ण टक्कल पडत आहे. या आजाराची दखल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतली असून गावात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या […]

सविस्तर वाचा

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीचे दर कडाडले

जनशक्ती (वृत्तसेवा)- नवीन वर्षाची सुरूवात होताच सोने- चांदीच्या दराने भरारी घेतली आहे. सरत्या वर्षाच्या अखेरीस सोने- चांदीच्या दरात मोठी पडझड झाल्याने हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता होती. पण 2025 च्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंनी ग्राहकांचा खिसा कापला. तीनच दिवसात सोने 1600 रुपयांनी तर चांदी 2000 रुपयांनी महागली. महागाईने सराफा बाजारात ग्राहकांचा खिसा कापला. हाच ट्रेंड कायम […]

सविस्तर वाचा

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन द्या! राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

जनशक्ती (वृत्तसेवा)- विधानसभेच्या  निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची पुर्तता राज्य सरकारने तातडीने  करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे. सरकारनं दिलेला शब्द पूर्ण करावा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन द्यावा, त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १ जानेवारी रोजी निवेदन देण्यात येणार असल्याची […]

सविस्तर वाचा

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन

जनशक्ती (वृत्तसेवा)- भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (वय ८४) यांचं निधन झालं आहे. मधुकर पिचड यांना १५ ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची आजारपणासोबत सुरु असलेली झुंज आज संपली व त्यांची प्राणज्योत मालवली. मधुकर पिचड यांच्या निधनामुळे भाजपची मोठी हानी झाली आहे. मधुकर पिचड […]

सविस्तर वाचा

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरीत पाच लाख भाविकांची मांदियाळी

जनशक्ती (वृत्तसेवा)- कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. आज सुमारे पाच लाख भाविकांच्या हरी नामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांनी चंद्रभागेत स्नान केल्यानंतर भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागली होती. मंगळवारी (दि.१२) श्री विठ्ठल दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली होती. तर श्रींच्या दर्शनासाठी १६ ते १८ […]

सविस्तर वाचा

महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजला; असा असेल निवडणूक कार्यक्रम

जनशक्ती (वृत्तसेवा)- अनेक दिवसांची प्रतिक्षा असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह झारखंड विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर, 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर […]

सविस्तर वाचा

लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ; कधीपर्यंत करता येणार अर्ज, वाचा सविस्तर

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे, ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज भरले नाहीत, त्या लाडक्या बहि‍णींना आपले अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहि‍णींना मोठा दिलासा मिळाला आहे. आता “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेचे अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ […]

सविस्तर वाचा

राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय; आज जोरदार पावसाचा इशारा

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यात मागील काही दिवसापासून नियमितपणे पाऊस होत आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. खान्देशातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, सध्या वायव्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे […]

सविस्तर वाचा